शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या जागेवरील वाॅल कम्पाऊंड ताेडले, कोट्यवधींचे नुकसान; गुन्हा दाखल

By संदीप वानखेडे | Published: April 7, 2024 05:57 PM2024-04-07T17:57:44+5:302024-04-07T17:58:36+5:30

याप्रकरणी बुलढाणा शहर पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Tampered with wall compound on Government Teachers College premises Crime registered | शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या जागेवरील वाॅल कम्पाऊंड ताेडले, कोट्यवधींचे नुकसान; गुन्हा दाखल

शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या जागेवरील वाॅल कम्पाऊंड ताेडले, कोट्यवधींचे नुकसान; गुन्हा दाखल


बुलढाणा : शहरातील शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणाच्या जुन्या डीएड हाॅस्टेलच्या जागेचे वाॅल कम्पाऊंड, आयसीटी रिसाेर्स सेंटरची इमारत व इतर साहित्याची अज्ञात आराेपींनी ताेडफाेड केली आहे. यामध्ये महाविद्यालयाचे जवळपास १ काेटी ३६ लाख १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी बुलढाणा शहर पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

बुलढाणा शहरातील मध्यवर्ती स्टेट बॅंकेजवळ शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा यांच्या नावाने एक भूखंड आहे. एकूण १७ हजार ९८९़ ३० चाैरस मीटर क्षेत्रफळ असलेला हा भूखंड महाविद्यालयाची शैक्षणिक संकुलाची जागा आहे. या जागेमध्ये जुन्या निवासाची इतर साहित्य, तसेच या जागेला कम्पाऊंड केलेले होते, त्याला लाेखंडी गेट बसवलेले हाेते व त्यावर महाविद्यालयाचे नामफलक लावलेले हाेते. या जागेच्या आवारामध्ये रुसांतर्गत आयसीटी रिसाेर्स सेंटरचे नवीन बांधकाम सुरू हाेते. त्यामध्ये नवीन वीज मिटरसुद्धा घेतलेले हाेते. ११ मार्च राेजी अज्ञात आराेपींनी स्टेट बँकेजवळची शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या जागेचे वॉल कम्पाऊंड, तसेच प्रस्तावित आयसीटी रिसाेर्स सेंटरचे नवीन बांधकाम ताेडले आहे. 

शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या शैक्षणिक संकुलाच्या जागेवर असलेले वॉल कम्पाऊंड, जुनी निवासाची इमारत साहित्य, लोखंडी गेट व त्यावरील फलक, तसेच रुसांतर्गत आयसीटी रिसर्च सेंटरची सुरू असलेले नवीन बांधकाम व त्यामध्ये असलेले नवीन वीज मीटर तोडून शासकीय मालमत्तेचे अंदाजे १ काेटी ३६ लाख १२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. सीमा लिंगायत यांनी शहर पाेलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञात आराेपींविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पाेलिस निरीक्षक गाेरे करीत आहेत.
 

Web Title: Tampered with wall compound on Government Teachers College premises Crime registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.