बुलडाणा जिल्ह्याला १३७0 लाभार्थींंचे लक्ष्यांक
By Admin | Published: August 27, 2016 03:02 AM2016-08-27T03:02:16+5:302016-08-27T03:02:16+5:30
विशेष घटक योजना; शंभर टक्के अनुदानावर दिला जातो लाभ.
नाना हिवराळे
खामगाव, दि. २६: अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकर्यांसाठी अर्थसहाय्य देण्यासाठी विशेष घटक योजना कार्यरत असून, सन २0१६-१७ या वर्षात बुलडाणा जिल्ह्यात १३७0 लाभार्थींंचे लक्ष्यांक देण्यात आले आहे. या योजनेत १00 टक्के अनुदानावर शेतकर्यांना लाभ दिला जातो.
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकर्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. विशेष घटक योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत १00 टक्के अनुदानावर लाभ दिला जातो.
या योजनेंतर्गत पीक संरक्षण अवजारे, शेतीचे सुधारित अवजारे, बैलगाडी, बैलजोडी, जुनी विहीर दुरुस्ती व नवीन विहिरीसाठी अनुदान देण्यात येते. या योजनेकरिता लाभार्थी निवडीची प्रक्रिया करण्यासाठी जिल्ह्यातील १३ ही पंचायत समित्यांना लक्ष्यांक देण्यात आले आहे. सन २0१६-१७ साठी लाभार्थी निवड करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. या योजनेकरिता नवीन विहिरीकरिता अनुदान र्मयादा एक लाख रुपये एवढी तर बैलजोडीसाठी ५0 हजार रुपये अनुदान र्मयादा ठेवण्यात आली आहे.
दारिद्र्य रेषेखालील शेतकर्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येत असले तरी या संवर्गातील लाभार्थी उपलब्ध न झाल्यास अन्य लाभार्थी याच सवलतीत निवडण्यात येणार आहेत. लाभार्थी निवडीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.