कोरोना लसीकरणासंदर्भात टास्क फोर्सची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:34 AM2021-04-10T04:34:09+5:302021-04-10T04:34:09+5:30
या बैठकीमध्ये कोरोना लसीकरणाच्या जागृती संदर्भात चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत, आशा अंगणवाडी सेविका, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, वैद्यकीय कर्मचारी व ...
या बैठकीमध्ये कोरोना लसीकरणाच्या जागृती संदर्भात चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत, आशा अंगणवाडी सेविका, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, वैद्यकीय कर्मचारी व ग्रामस्तरावर असलेले सर्व कर्मचारी, अधिकारी यांच्या संयोगातून भविष्यात आरोग्य उपकेंद्र असलेल्या ठिकाणी लसीकरणास सुरुवात करावयाची आहे. यासंदर्भात नियोजन करण्यात आले. सर्व दुकानदारांना कोरोनाची चाचणी करूनच दुकान उघडण्यास सांगण्यात आले. त्यांना लस आवश्यक करण्यात करण्याचे सांगितले.
लसीकरण जागृतीच्या संदर्भात उपलब्ध कर्मचाऱ्यांनी गावात जनजागृती फेरी काढावी.
प्रत्येक कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण सक्तीचे करण्यात यावे. ज्या उपकेंद्रात लसीकरण करावयाचे आहे, त्या ठिकाणी स्थानिक कर्मचारी उपस्थिती असणे अनिवार्य आहे. तलाठी, ग्रामसेवक, आशासेविका, अंगणवाडी सेविका, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने जास्तीत जास्त लसीकरण करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.