Coronvirus : टाटा ट्रस्टची बुलडाणा कोवीड रुग्णालयास दोन कोटींची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 08:45 PM2020-04-30T20:45:54+5:302020-04-30T20:51:11+5:30
टाटा ट्रस्टने बुलडाणा कोवीड रुग्णालयास दोन कोटींची मदतदिली आहे.
बुलडाणा: कोवीड-१९ संसर्गावर उपचार करण्यासाठी बुलडाण्यात उभारण्यात आलेल्या १०० खाटांच्या महिला रुग्णालयाला कोवीड रुग्णालय म्हणून दर्जा देण्यात आला आहे.
येथील वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि नसलेल्या मुलभूत सुविधांमुळे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाचे वाभाडे निघत होते. येथे सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोणातून विविध पातळ््यावर सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले असून राष्ट्रहितास प्राधान्य देणाºया टाटा ट्रस्टच्या वतीने बुलडाणा कोवीड रुग्णालयासाठी दोन कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.
दरम्यान, या मदतीतून आराखड्यानुसार लवकरच कामही सुरू होणार असल्याची माहिती बुलडाण्याचे माजी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताा दिली.
बुलडाणा येथील या कोवीड रुग्णालयात जिल्ह्यातील संशयीत रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण व कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण व कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांच्या उपचारासाठी याच रुग्णालयाचा वापर केला जात आहे. मात्र येथे अद्ययावत सुविधा उपलब्ध नव्हत्या, मुलभूत सुविधांचाही येथे अभाव होता. त्या विरोधात येथे गेल्या काही दिवसापासून मोठी ओरड होत होती. त्यातून जिल्हा प्रशासनाचे वेळोवेळी वाभाडेही निघत होते. त्या पार्श्वभूमीवर येथे रुग्णांची हेळसांड झाल्याच्या अनेक बाबी सुद्धा समोर आल्या होत्या. त्यामुळे हे रुग्णालय सर्व भौतिक सुविधांनी सुसज्ज व अद्ययावत असावे यासाठी अ़नेक पातळीवर प्रयत्न सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून अनेक स्वयंसेवी संस्थांकडे पाठपुरावा सुरू होता. ज्यात मातृभूमी फाऊंडेशनच्या वतीने व्यक्तीश: हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून लोकसेवेसाठी अग्रेसर असलेली संस्था टाटा ट्रस्टकडून अपेक्षा व्यक्त केली होती. त्यासंदर्भातील प्रयत्नांना अखेर यश आले आहे. सदैव सामाजिक कार्यत भाग घेऊन आपल्या दानशूर ते साठी लौकिक असलेल्या टाटांनी करोना विरुद्धच्या लढाईचे दीर्घकाळासाठीचे नियोजन केले असून स्वत: पुढाकर घेत आराखडा बनवला आहे. टाटा ट्रस्टने बुलडाणा येथील महिला रूग्णालयाच्या सक्षमीकरणासाठीही पाऊल उचलेले असून त्यातंर्गतच ही दोन कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे ही बुलडाणा जिल्ह् यासाठी महत्त्वपूर्ण बाब म्हणावी लागले.
ही होणार कामे
या मदतीतून रुग्णालयातील स्थापत्य कामे, एक्स्ट्रा लो व्होलटेज सिस्टीम, हेथींग, व्हेंटीलेशन आणि वातानुकुलीत यंत्रणा (एचव्हीएसी), पब्लीक हेल्थ इंजिनिरींग (पीएचई), अग्नीश्यामक यंत्रणा, अंतर्गत रचना कार्य ही कामे टाटा ट्रस्टकडून केल्या जाणार असून त्यावर तब्बल सव्वा दोन कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती माजी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.