शिक्षकांच्या प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:30 AM2021-02-05T08:30:46+5:302021-02-05T08:30:46+5:30
एस. एम. शेळके, स. शिक्षक, विवेकानंद विद्यामंदिर, हिवरा आश्रम फिजिकल डिस्टन्स व मास्कच्या सातत्याने वापराविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. ...
एस. एम. शेळके, स. शिक्षक, विवेकानंद विद्यामंदिर, हिवरा आश्रम
फिजिकल डिस्टन्स व मास्कच्या सातत्याने वापराविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. या मार्गदर्शनासोबतच अध्ययनाकडे त्यांचे विशेष लक्ष कसे लागेल, याची खबरदारी घेऊन आम्ही शाळेमध्ये अध्यापनाचे कार्य करीत आहोत.
भगवान राईतकर, सहा. शिक्षक, विवेकानंद विद्यामंदिर, हिवरा आश्रम
विद्यार्थ्यांना दररोज ठराविक अंतराने राहण्यासाठी सूचना केल्या जातात. वर्गातसुद्धा एका बेंचवर एकच विद्यार्थी बसेल, याची काळजी घेतली जाते. बेंचवर बसतानासुद्धा एक विद्यार्थी अलीकडच्या टोकावर, तर मागचा विद्यार्थी पलीकडच्या टोकावर अशा पद्धतीने बसविले जातात.
पी. आर. पडघान, सहा. शिक्षक, विवेकानंद विद्यामंदिर, हिवरा आश्रम