अध्यापक विद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 01:40 PM2020-08-20T13:40:04+5:302020-08-20T13:40:34+5:30

अनेक विनाअनुदानीत अध्यापक विद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

Teachers' collage on the verge of closing | अध्यापक विद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर

अध्यापक विद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर

Next

- संदीप वानखडे  
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गत सात ते आठ वर्षांपासून शिक्षक भरतीच होत नसल्याने विद्यार्थ्यांनी डिएलएडकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. गत तीन वर्षापासून अर्ध्यापेक्षा जास्त जागा विद्यार्थी मिळत नसल्याने रिक्त राहत आहेत. त्यामुळे, अनेक विनाअनुदानीत अध्यापक विद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
राज्य सरकारगणीक शिक्षक भरतीचे नियम व निकष बदलत आहेत. सन २०१३ नंतर शिक्षक भरतीच होत नसल्याने १२वीनंतर डिएलएडकडे विद्यार्थ्यांनी गत काही वर्षांपासून पाठ फिरवली आहे. विना अनुदानीत अध्यापक विद्यालयांना मोठ्या प्रमाणात परवारनगी देण्यात आली. त्यामुळे तालुकास्तरापर्यंत अध्यापक विद्यालय थापन झाले. काही वर्षांनी शिक्षक भरतीच बंद झाल्याने विद्यार्थी अध्यापक विद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेशच घेत नसल्याचे चित्र आहे. यावर्षी जिल्ह्यात १८०० जागांसाठी प्रवेश प्रक्रीया सुरू झाली आहे. त्यातही शासकीय डीएलएड महाविद्यालयांमध्ये प्रवेश देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे, आता केवळ अनुदानीत आणि विनाअनुदानीत डीएलएड महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. दोन अनुदानीत आणि २६ विना अनुदानीत अध्यापक विद्यलयासाठी ही प्रवेश प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. गत काही वर्षांपासून अर्ध्यापेक्षा जास्त जागा रिक्त राहत आहेत. तर काही अध्यापक विद्यालयांना विद्यार्थीच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, हे अध्यापक विद्यालये बंद पडून तेथील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार आहे. डीएलएड केल्यानंतर टीईटी आणि त्यानंतर टेट परीक्षा उत्तीर्ण करण्याचे निकष शिक्षक होण्यासाठी युती सरकारने ठरविले होते.


डीएलएड केल्यानंतर सीईटी, टेट परीक्षा उत्तीर्ण करावे लागते. नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थी संख्या घटली आहे. बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षी १८०० जागांसाठी प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येते. मात्र, केवळ ४८ टक्के जागा भरल्या जातात. उर्वरीत ५२ टक्के जागा रिक्त राहत आहेत.
- विजयकुमार शिंदे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलडाणा

 

Web Title: Teachers' collage on the verge of closing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.