Teacher's Day Special : आयुष्य घडविणाऱ्या शिक्षकांच्या आठवणींचा अनमोल ठेवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 12:19 PM2020-09-05T12:19:43+5:302020-09-05T12:19:55+5:30
आयुष्य घडविणाºया शिक्षकांच्या आठवणींचा अनमोल ठेवा आजही मनाच्या एका कप्प्यात जपलेला आहे.
- ब्रह्मानंद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आयुष्य घडविणाºया शिक्षकांच्या आठवणींचा अनमोल ठेवा आजही मनाच्या एका कप्प्यात जपलेला आहे. आज जे काही यश मिळविले आहे, त्या यशामागे शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी शिक्षकांचा गौरव केला.
इंग्रजीचा पाया असा झाला पक्का
मला भुगोल हा विषय आवडायचा. माझे आवडीचे शिक्षक सुलेखा बेगम व परनीकुमार. सुलेखा बेगम ह्या मॅडम आम्हाला इंग्रजी विषय शिकवायच्या. ह्या शिक्षकांनी जसा इंग्रजीचा पाया भक्कम केला होता, त्यामुळे आयुष्यात इंग्रजी विषयाचे अनेक फायदे समोर होत गेले. तसे माझे दहावी पर्यंतचे शिक्षण तामीळनाडु राज्यातील सेलम येथील श्री विद्यामंदिर येथे झाले.
आज जे काही आहे, ते शिक्षकांमुळेच!
अभ्यासात कितीही हुशार असले, तरी त्या योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, तर त्याला यश मिळविणेही कठीण आहे. आपण आयुष्यात खूप काही मिळवितो, त्या पाठीशी काही प्रसंग असतात. मी सुद्धा अभ्यासात हुशार होतो, पण शिक्षकांनीच योग्य मार्गदर्शन दिल्याने जीवनाला एक दिशा मिळाली.
तामीळनाडू राज्यातील सेलीम येथे माझे शिक्षण झाले. तिथे माझ्या आयुष्याला आकार देणारे वनस्पतीशास्त्र (बॉटनी) विषय शिकविणारे शिक्षक परनीकुमार भेटले. त्यांची महाविद्यालयीन जीवनापासून पुन्हा भेटच झाली नाही.
तो प्रसंग आजही न विसरता येणारा...
दहावीचे शिक्षण घेत असताना मी नोटीस बोर्डवर माझी परीक्षेतील रँक शोधत होतो. तेंव्हा माझ्या बाजुला माझे शिक्षकही उभे होते. परंतू मी चौदाव्या ते पंधराव्या रँकमध्ये होतो. तेंव्हा बाजुला असलेले शिक्षक मला म्हणाले की, ‘तू कितव्या रँकमध्ये आहेस,’ मी त्यांना माझा रँक सांगितल्यानंतर ते शिक्षकांनी माझ्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या.
अन् जीवनाला कलाटणी मिळाली...
दहावीमध्ये शाळेतून प्रथम व जिल्ह्यातून दुसरा क्रमांक मिळवला. एक दिवस शिक्षकांनी प्रोत्साहन देऊन तुझ्याकडून मोठ्या यशाची अपेक्षा असल्याने मला बोलून दाखवले. तेंव्हापासून आयुष्याला एक वेगळी कलाटनी मिळाली. सुरूवातीला रिझर्र्व्ह बँकेमध्ये नोकरी मिळविली. रिझर्व्ह बँकेत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्यानंतर जिल्हा परिषद सीईओ आणि आता बुलडाणा जिल्हाधिकारी पदापर्यंतचे यश मिळविता आले आहे.
शालेय, महाविद्यालयीन जीवनात शैक्षणिक प्रगती चांगली असल्याने शिक्षकांकडून कौतूक झाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आयुष्यात चांगला हुद्दा मिळविण्याची जिद्द निर्माण झाली.
- षण्मुगराजन एस.