ग्रामीण भागातील शिक्षकांनी घेतले स्पोकन इंग्लिशचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 02:27 PM2018-01-15T14:27:09+5:302018-01-15T14:28:49+5:30
मेहकर : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजी पॅटर्न सुरू करण्यात आले असून या शाळेतील विद्यार्थ्यांना फायदा होण्याच्या दृष्टीकोनातून इंग्रजीचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या शिक्षकांनी ८ ते १२ जानेवारी दरम्यान येथील शिंदे पॉलीटेक्नीक कॉलेज मध्ये स्पोकन इंग्लीशचे प्रशिक्षण घेतले.

राज्यातील जिल्हा परिषद व नगरपालिका शाळेतील शिक्षक सध्या जलद प्रगत शैक्षणीक महाराष्ट्र कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहे. ग्रामीण भागतील जिल्हा परिषद शाळेमध्ये सेमी इंग्रजी पॅटर्न सुुरु असून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उत्तम मिळत आहे. यात भर टाकण्यासाठी शासनाने शिक्षकासाठी स्पोकन इंग्लीश प्रशिक्षनाचे आयोजन केले असून याचा पहिला टप्पा ८ ते १२ जानेवारीला पार पडला. यावेळी उपस्थितीत शिक्षकांना तज्ञ मार्गदर्शन जे.बी तनपुरे व के.बी. कंकाळ यांनी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामुळे शिक्षकांचा आत्मविश्वास बळावला असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात दिला जाईल, अशा प्रतिक्रिया सहभागी शिक्षकांनी व्यक्त केल्या. प्रशिक्षणात पि.ए.मोरे, माधवराव पवार, दत्ता भराड, अमित चाकोते, सरकटे, परीहार, सौ.खैरे, सिमा जोशी, सतिष पवार, केशव गिºहे, ज्ञानेश्वर धांडे, वारकरी, डोंगरदीवे, धोटे, तडस सह शिक्षक व शिक्षीका यांनी सहभाग घेतला.(तालुका प्रतिनिधी)