खामगाव: पालिकेच्या शाळेत शिक्षिकेची विद्यार्थिनीस मारहाण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:48 AM2018-03-13T01:48:06+5:302018-03-13T01:49:05+5:30
खामगाव: शहरातील एका पालिकेच्या शाळेतील विद्यार्थिनीस मारहाण करण्यात आली. गालावर आणि कानावर जखम झाल्याने पोलिसांनी विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणीही केली. त्यानुसार तक्रार दाखल केली जात असतानाच, पालकांनी वेळीच पोलीस तक्रारीस नकार दिला. त्यामुळे पालकांकडून लेखी घेत पोलिसांनी प्रकरण मिटविले.
लोकमत न्यूज नेटवर्क

शहरातील पालिकेच्या एका शाळेत दुपारी एका शालेय विद्यार्थिनीस खरोटे नामक शिक्षिकेने मारहाण केली. शिक्षिकेच्या मारहाणीत विद्यार्थिनी जखमी झाली असून, तिच्या कानावर तसेच गालावर जखम झाली. विद्यार्थिनीने घडलेला प्रकार घरी सांगितला. त्यानंतर सायंकाळी सदर विद्यार्थिनी आपल्या आई-वडिलांसह शहर पोलीस स्टेशनला दाखल झाली. तक्रार देण्यापूर्वी विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, पालकांनी पोलीस तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे शहर पोलिसांनी पालकांकडून लेखी लिहून घेत, प्रकरण मिटविले. तथापि, याच शिक्षिकेविरोधात यापूर्वीही काही पालकांच्या तक्रारी असल्याची चर्चा पोलीस स्टेशनमध्ये होती. दरम्यान, सोमवारी घडलेले विद्यार्थिनी मारहाण प्रकरण सामोपचाराने मिटविण्यासाठी पालिकेतील एका शिक्षक नेत्यासह प्रशासन अधिकाºयांची शिष्टाई कामी आली. तक्रार दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी पालकांनी नकार दिल्याने, पोलिसांनी या प्रकरणातून काढता पाय घेतला. सोबतच याप्रकरणी तक्रार न देण्यासाठी पालकांवर राजकीय दबाव आणण्यात आल्याचीही चर्चा पोलीस वर्तुळात होती. दरम्यान, यासंदर्भात पालिकेचे प्रशासन अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा मोबाइल फोन नॉट रिचेबल आला.