कोवीड समर्पीत रुग्णालयात टेलीमेडीसीन सुविधा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:25 PM2020-08-10T12:25:57+5:302020-08-10T12:26:41+5:30
कोवीड-१९ रुग्णालयात टाटा ट्रस्टच्या सहकार्याने पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
बुलडाणा : येथील कोवीड समर्पीत रुग्णालयात टेलीमेडीसीन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे बुलडाण्यातील गंभीर रुग्णांवर प्रसंगी उपचार करण्यासाठी विदेशासह, पुण्या, मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांशी थेट संवाद साधून उपाचर करणे शक्य होणार आहे.
सुमारे चार कोटी रुपये खर्च करून बुलडाण्यातील स्त्री रुग्णालायात उभारण्यात आलेल्या कोवीड-१९ रुग्णालयात टाटा ट्रस्टच्या सहकार्याने पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यातंर्गतच ही सुविधा येथे देण्यात आली आहे. कोवीड समपीत रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १० आॅगस्ट रोजी ई-लोकार्पण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता ही बाब समोर आली.
विशेष म्हणजे कोवीड रुग्णालयामध्ये कार्यरत डॉक्टरांसाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून पीपीई कीट घालण्यासाठीही स्वतंत्र कक्ष देण्यात आले आहे.
रुग्णालयाचा स्वतंत्र फिल्टरप्लॅन्ट असून, रुग्णालयातील संपूर्ण १०० बेड हे सेंट्रल आॅक्सीजन सुविधा युक्त आहेत. या व्यतिरिक्त २० बेडचे आयसीयू युनीट उभारण्यात आलेले आहे. कोरोना रुग्णांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे आॅक्सीजन युनीट येथे असल्याने गंभीर रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे. यासाठी तब्बल ३२ जंबो आॅक्सीजन सिलींडर, येथे उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच कार्डियाक बेड्स, मॉनिटर्स सुविधा ही येथे उपलब्ध करण्यात आला आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमत्री ्अजीत पवार हे मुंबईतूनच या रुग्णालयाचे दुपारी साडेबाराच्या सुमारास २ई-लोकार्पण करणार असून तशी घोषणा त्यांनी केल्यानंतर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे या रुग्णालयाचे औपचारिकरित्या फित कापून लोकार्पण झाल्याचे जाहीर करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. प्रारंभी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात एक छोटेखानी कार्यक्रम होणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले.