बुलढाण्यात साकारले केदारनाथ येथील मंदिर; डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य, रूद्र गणेश मंडळाची संकल्पना
By ब्रह्मानंद जाधव | Published: September 20, 2023 05:53 PM2023-09-20T17:53:54+5:302023-09-20T17:54:09+5:30
डोळ्यांचे पारणे फेडणारे हे दृश्य पाहण्यासाठी भाविकांची गर्दी जमत आहे.
बुलढाणा : येथील रूद्र गणेश मंडळाने केदारनाथ येथील मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारे हे दृश्य पाहण्यासाठी भाविकांची गर्दी जमत आहे. येथील रूद्र गणेश मंडळ वर्षानुवर्षे शहरातील संगम चौक परिसरात श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करते. दरवर्षी मंडळातील सजावट देखणी असते. कधी डोळ्यांसमोर प्रत्यक्षपणे इतिहास दाखवणारे देखावे, तर कधी डोळ्यांचे पारणे फेडणारी सजावट मंडळाने नेहमीच सादर केली आहे.
यंदा २०२३ च्या गणेश उत्सवात रूद्र गणेश मंडळाने केदारनाथ मंदिर उभारले आहे. श्री महादेव भक्तांसाठी केदारनाथ मंदिर जणू स्वर्गच असल्याचे समजते. रूद्र गणेश मंडळाकडून गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला गणेशाची मूर्ती स्थापित करण्यात आली आणि मंगळवारी विधिवत पूजन करून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. रूद्र ग्रुपकडून सातत्याने सामाजिक कार्य घडले आहे.