प्रकल्पासोबत सेल्फीचा मोह बेतू शकतो जिवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:39 AM2021-09-15T04:39:49+5:302021-09-15T04:39:49+5:30
धोक्याची सूचना देणाऱ्या फलकाला ओलांडून जातात पर्यटक देऊळगाव साकर्शा गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या उतावळी प्रकल्पाकडे जात ...
धोक्याची सूचना देणाऱ्या फलकाला ओलांडून जातात पर्यटक
देऊळगाव साकर्शा गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या उतावळी प्रकल्पाकडे जात असतानाच मार्गावरच प्रतिबंधित क्षेत्र उतावळी धरणार प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. असा फलक लावण्यात आला आहे. तरीही पर्यटक या प्रकल्पाकडे हा फलक ओलांडून जातात.
असे आहेत जिल्ह्यातील धबधबे
जिल्ह्यातील नळकुंड येथे भव्य असा धबधबा आहे. येथे अनेक जण भेटी देतात. मात्र, येथे सुरक्षा रक्षकच नसतात सोबतच मार्गदर्शक सूचनाही दिल्या जात नाहीत.
उतावळी प्रकल्पाला भेट देण्याआधी आता विचार करा
उतावळी प्रकल्प हे पूर्णपणे भरलेले आहे. त्यामुळे तेथे जाणे धोकादायक आहे आणि त्यानुसार आम्ही तसे फलकसुद्धा त्या ठिकाणी लावलेले आहेत; परंतु त्याला न जुमानता काही लोक तेथे जात असल्याने असा प्रकार घडत आहे. त्यामुळे यापुढे सदर उतावळी प्रकल्पाच्या सांडव्याच्या ठिकाणी कोणी पाहण्याच्या दृष्टीने गर्दी करताना आढळल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-राहुल गोंधे, ठाणेदार, जानेफळ पोलीस स्टेशन.
वेळोवेळी सूचना दिल्या, नोटीसही काढल्या
प्रकल्प जरी नयनरम्य जरी वाटत असला तरी या प्रकल्पाला भेट देताना काळजी घेणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. नोटीसही काढल्या आहेत. मात्र, काही पर्यटक याला न जुमानता ग्रामपंचायत प्रशासनाला न कळविता प्रकल्पावर जातात. तेव्हा पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
-संदीप अल्हाट, सरपंच, देऊळगाव साकर्शा.
पर्यटनापेक्षाही जीव महत्त्वाचा
सुटीच्या दिवशी पर्यटन क्षेत्राला भेट देणे चुकीचे नाही. मात्र, पर्यटनापेक्षाही आपला जीव महत्त्वाचा आहे. धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे, सोबतच भीतीदायक ठिकाणी सेल्फीचा मोह आवरावा.
-ॲड. नारायण पायघन, वंचित बहुजन आघाडी वकील संघ प्रदेश कार्याध्यक्ष.