दहा ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:38 AM2021-05-25T04:38:42+5:302021-05-25T04:38:42+5:30
कोरोनामुळे गोरगरीब आणि गरजूंना मोफत ऑक्सिजन मिळावे, यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी पालकमंत्री आ. डॉ. संजय ...
कोरोनामुळे गोरगरीब आणि गरजूंना मोफत ऑक्सिजन मिळावे, यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी पालकमंत्री आ. डॉ. संजय कुटे यांच्या संकल्पेतून श्रीराम कुटे गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट जळगाव जामोद अंतर्गत कुटे परिवाराने स्वखर्चातून दहा ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध करून दिले आहेत. हे ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद वाघ, भाजप सिंदखेडराजा तालुकाध्यक्ष गजानन घुले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. येत्या दहा दिवसांत अजून ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मिळणार असून, गरजूंना मोफत देण्यात येणार आहे.
पालकत्व गेलेल्या मुलांना घेणार दत्तक
१८ वयोगटाच्या आतील ज्या मुलांचे कोरोनामुळे पालकत्व हरवले आहे, त्यांना श्रीराम कुटे गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट दत्तक घेणार आणि त्यांच्या शिक्षणापासून संपूर्ण खर्च आमदार डॉ. संजय कुटे करणार आहेत. गरजूंनी संपर्क साधावा, असे आवाहन विनोद वाघ यांनी केले आहे.