कोराना बाधितांचे दहा नमुने तपासणीसाठी पुण्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:06 AM2021-02-21T05:06:13+5:302021-02-21T05:06:13+5:30

जिल्ह्यात सध्या दुसऱ्या कोराना लाटेची साथ आल्याचे संकेत मिळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. त्यातच गेल्या ...

Ten samples of Korana victims sent to Pune for testing | कोराना बाधितांचे दहा नमुने तपासणीसाठी पुण्याला

कोराना बाधितांचे दहा नमुने तपासणीसाठी पुण्याला

Next

जिल्ह्यात सध्या दुसऱ्या कोराना लाटेची साथ आल्याचे संकेत मिळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. त्यातच गेल्या पाच दिवसांपासून दररोज १०० पेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यानही जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येने दररोज बाधित रुग्ण आढळून येत नव्हते. त्या पार्श्वभूमीवर सुक्ष्मस्तरावरील अभ्यासाच्या दृष्टिकोणातून हे नमुने पाठविण्यात येत आहेत.

दुसरीकडे १९ फेब्रुवारी रोजी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या झालेल्या व्हीसीमध्ये कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासठी जिल्हास्तरावर गंभीरतेने प्रयत्न करण्यासोबतच आरोग्य यंत्रणेकडून नियमित आढावा घेण्यासोबतच चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यावर जोर देण्याचे निर्देश दिले आहे. बुलडाणा जिल्ह्यालगतच्या काही जिल्ह्यात परिस्थिती गंभीर बनत आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातही प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

Web Title: Ten samples of Korana victims sent to Pune for testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.