रेमडेसीव्हीर इंजेक्शनसाठी कक्ष सेवकाने घेतले दहा हजार रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 12:11 PM2020-10-09T12:11:00+5:302020-10-09T12:12:48+5:30
CoronaVirus remedivir injection कक्ष सेवक सागर जाधव याने दहा हजार रुपयाची मागणी केली होती.
बुलडाणा: येथील डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटलमधील संदिग्ध रुग्णास रेमडेसीव्हीर इंजेक्शन देण्यासाठी कक्ष सेवक सागर जाधव याने दहा हजार रुपये घेतल्याचा प्रकार सात आॅक्टोबर रोजी उघडकीस आला. दरम्यान, या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. घोलप सुरेश घोलप यांनी पाच सदस्यीय चौकशी समिती गठती केली आहे.
बुलडाणा येथील कोवीड रुग्णालयात दाखल असलेल्या लोणार तालुक्यातील गुंजखेड येथील ५४ वर्षीय महिलेला रेमडेसीव्हीर इंजेक्शन देण्यासाठी कोवीड रुग्णालयातील कक्ष सेवक सागर जाधव याने दहा हजार रुपयाची मागणी केली होती. या महिलेस श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे या महिलेस ४ आॅक्टोबरला अतिदक्षता वि•ाागात दाखल करण्यात आले होते. अशातच ५ आॅक्टोबरला तेथील कक्षसेवक सागर जाधव याने रुग्ण महिलेच्या नातेवाईकास रेमडेसीव्हीर इंजेक्शन लावल्यास रुग्ण बरा होतो असे सांगून दोन इंजेक्शनचे दहा हजार रुपये घेतले. परंतू सहा आॅक्टोबरच्या मध्यरात्री या महिलेचा मृत्यू झाला. सकाळी नातेवाईक रुग्णालयात आले असता तोंडीस्वरुपात ही माहिती समोर आले. त्याची माहिती स्थानिक डॉ. वासेकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक घोलप यांना ही माहिती दिली. प्रकरणी त्वरित डॉ. घोलप यांनी रुग्णालय गाठून प्रकरणाची शहानिशा करत या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती गठीत केली आहे. यामध्ये आरएमओ डॉ. सचिन कदम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वासेकर, फिजिशियन डॉ. असलम खान व अधिसेवक संदीप आढाव यांचा यात समावेश आहे. घडलेला प्रकार गं•ाीर स्वरुपाचा असून या प्रकरणात सत्यता आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल. प्रसंगी पोलिसातही तक्रार देवू, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश घोलप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.