शिवणी आरमाळ शेतकऱ्यांचा विषमुक्त शेतीकडे वाढला कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:23 AM2021-07-21T04:23:39+5:302021-07-21T04:23:39+5:30
कृषी विभागाची "कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था" यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अकोलामार्फत संवर्ग विकास समिती देऊळगाव ...
कृषी विभागाची "कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था" यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अकोलामार्फत संवर्ग विकास समिती देऊळगाव राजातर्फे शिवणी आरमाळ येथील "जय गोपाल जैविक शेती गटाला सेंद्रिय तरल खत, जिवामृत, दशपर्णी अर्क आदींचे द्रावण तयार करण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना ३०० लिटर क्षमता असलेली प्लॅस्टिक टाकी १०० टक्के अनुदानित तत्वावर मिशनतर्फे आज वाटप करण्यात आल्या. या माध्यमातून शेतातील पिकांवर उत्पादन खर्चात घट होणार असून, त्यामुळे जमिनीचे व वातावरणाचे आरोग्य सुद्धा सुधारण्यासाठी हातभार लागणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधव आता माळरानावर, पडीक जमिनीवर सुद्धा बागायती शेती सहज फुलवणार आहेत. यावेळी तालुक्यातील दहा जैविक शेती गट एकत्र करून संयुक्त विद्यमाने स्थापन झालेल्या "देऊळगाव राजा जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपनी"चे संस्थापक संचालक सचिव कैलास अर्जुन नागरे यांच्यासह तालुका समन्वयक किरण शेरे यांनी गटाला पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन व संबोधित करून जैविक शेतीसाठी प्रेरित केले.
हा गट जैविक शेतीशी निगडित असून, या गटाच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांना अनेक कृषी योजनांचा लाभ व सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रशिक्षण मिळत आहे.
डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अकोलामार्फत वेळोवेळी गावागावात प्रशिक्षणे आयोजित करून घरच्या घरी जमीन व पिके निरोगी राहून त्या माध्यमातून कमी खर्चात अधिकाअधिक गुणवत्तापूर्ण विषमुक्त उत्पन्न वाढीसाठी घरीच बिडीकंपोस्ट, एस. नाईन कल्चर, दशपर्णी अर्क, निमार्क, जिवामृत, तरल खत व आदी वेगवेगळे टॉनिक व औषधी बनवून त्याचाच वापर पीक वाढीच्या अवस्थेनुसार व जमिनीत करण्याचे मार्गदर्शन करण्यात येते. त्यामुळे नक्कीच आता जास्तीत जास्त सेंद्रिय शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांची उत्पादन खर्चात घट होऊन उत्पादन वाढताना दिसत आहे.
या उपक्रमासाठी टाकीचे वाटप हे गटाचे अध्यक्ष कैलास अर्जुन नागरे व गटाचे मास्टर ट्रेनर किरण शेरे यांच्या हस्ते सर्वच सभासदांना करण्यात आले. त्यावेळी गटाचे एलाआरपी उमेश आरमाळ, सभासद दिलीप राठोड, शिवाजी आरमाळ, समाधान गिते, दिगंबर पवार, दत्तात्रय आरमाळ, संजय टेलर, दीपक गायके, विठोबा सानप, रवी आरमाळ, भगवान गायके, दत्ता नागरे, संतोष आरमाळ, अंबादास गायके, पंजाब आरमाळ, पुरुषोत्तम गायके, खुशालराव आरमाळ, शेख इमाम, अनिल आरमाळ, परशराम नागरे, बळीराम आरमाळ, मदन गायके, संजय आरमाळ, रामप्रसाद परहाड उपस्थित होते.
200721\img-20210720-wa0255.jpg
शिवणी आरमार बातमी फोटो