दहा हजार शेतकर्यांची लाभासाठी ससेहोलपट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 01:44 AM2018-02-15T01:44:43+5:302018-02-15T01:44:53+5:30
मलकापूर : शेतकरी कर्जमाफी योजनेत हजारो शेतकर्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. अर्थात अजूनही यादय़ा अंतिम नाहीत, त्यासाठी लाभार्थ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. त्यातील शासन व बँका यांच्यातील वेगवेगळ्या मुद्यावरुन पुढे येत असलेले ‘मिसमॅच’ सद्यस्थितीत लाभार्थ्यांच्या मुळावर उठल्याचे दिसत आहे.
हनुमान जगताप ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : शेतकरी कर्जमाफी योजनेत हजारो शेतकर्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. अर्थात अजूनही यादय़ा अंतिम नाहीत, त्यासाठी लाभार्थ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. त्यातील शासन व बँका यांच्यातील वेगवेगळ्या मुद्यावरुन पुढे येत असलेले ‘मिसमॅच’ सद्यस्थितीत लाभार्थ्यांच्या मुळावर उठल्याचे दिसत आहे. विदर्भ प्रवेशद्वाराच्या सुमारे दहा हजारावर शेतकर्यांची कर्जमाफीच्या लाभासाठी ससेहोलपट होताना दिसत आहे.
शासनाच्यावतीने शेतकर्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरु करण्यात आली. त्यात कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हजारो शेतकर्यांनी ऑनलाइन अर्जाचा भरणा केल्याचे सर्वश्रुत आहे. अगदी सुरुवातीपासूनच या योजनेला ग्रहण लागल्याचे वारंवार स्पष्ट झाले. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र शेतकर्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
आधी यादय़ांचा घोळ, त्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र लाभार्थ्यांवर नानाविध अटी व शर्ती लादण्यात आल्याने या योजनेत एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे प्रत्यक्षात किती शेतकर्यांना कर्जमाफी मिळाली, हा प्रश्न आधीपासूनच आतापर्यंत गुलदस्त्यातच, कारण त्या विषयावरून आजही, शासन आणि शेतकरी यांच्यातील दुवा असलेल्या सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे कानावर हात आहेत. शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीच्या लाभासाठी हजारो शेतकर्यांनी ‘ऑनलाइन’ अर्ज भरले आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामध्ये आधारकार्ड नंबरातील चुका, पासबुकवरील नावात तफावत, एकाच कुटुंबातील दोन कर्जदार, माफी मात्र एकाला, अशा विविध बाबींचे मिसमॅच लाभार्थ्यांच्या मुळावर उठल्याचे दिसत असून, परिणामी विदर्भ प्रवेशद्वारी कर्जमाफीसाठी पात्र सुमारे दहा हजारावर शेतकर्यांची लाभासाठी ससेहोलपट होतेय.
‘कशी बशी कर्जमाफी जाहीर झाली. अनेक अटी त्यासाठी लादण्यात आल्या. एक प्रकारे ही शेतकर्यांची थट्टाच आहे. याद्यांचा घोळही आहेच. एक प्रकारे ही गरीब शेतकर्यांची छळवणूक आहे. प्रकरणी अशा शेतकर्यांना शासनाने कर्जमाफीचा लाभ देऊन न्याय द्यावा.
- दामोधर शर्मा ,
जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना
सरकारला वाटतो तेवढा हुशार शेतकरी नाही, तर तो एक प्रामाणिक माणूस आहे. चुका या माणसाकडूनच होतात. त्यामुळे ऑनलाइन अर्ज भरताना चुका झाल्या असतील, त्या समजून घेतल्या पाहिजे. कर्जमाफी करुन शासनाने दाखविलेला मोठेपणा यातही दाखवायला हवा.
- ज्ञानदेव ढगे,
सरपंच अनुराबाद, ता.मलकापूर.
ऑनलाईन अर्ज भरताना माहिती देण्यात आली. त्यात विसंगती आहे. त्यात कुणा एकाची चूक धरता येणार्या नाही. आमच्याकडेही त्यापध्दतीची असंख्य प्रकरणे आली आहे. त्यावर उपाययोजना करातना चुकांची दुरुस्ती करण्यावर आम्ही भर दिला. त्यातून बरीचशी प्रकरणे निकाली निघाली आहेत.
- संजय जाधव, विभागीय अधिकारी, जिल्हा केंद्रीय सहकारी बँक