बायगाव येथे १३ व्यक्तींवर गुन्हे दाखल केल्याने तणाव

By admin | Published: August 27, 2016 03:00 AM2016-08-27T03:00:01+5:302016-08-27T03:00:01+5:30

पोलीस अधिक्षकांना निवेदन; गुडंप्रवृत्तीच्या व्यक्तीला तडीपार करण्याची ग्रामस्थांची मागणी.

Tension due to filing of cases against 13 people at Bigaon | बायगाव येथे १३ व्यक्तींवर गुन्हे दाखल केल्याने तणाव

बायगाव येथे १३ व्यक्तींवर गुन्हे दाखल केल्याने तणाव

Next

अंढेरा(जि. बुलडाणा), दि. २६ : अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या बायगांव खुर्द येथे मुलीने छेडखानी केल्याची तक्रार दिल्याच्या कारणावरुन गावातील १३ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. बायगाव येथील शेनफड चतुसिंग जाधव या व्यक्तीवर २५ गुन्हे दाखल आहे. सदर व्यक्तीच्या मुलीने पोलिसात छेडखानी झाल्याची तक्रार दिली. या आधारे २५ ऑगस्ट रात्री ७.३0 वाजता गावातील १३ व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे गावातील नागरिक संतप्त झाले असून, तणावपुर्ण वातावरण आहे. आपल्या विरुद्ध दिलेल्या तक्रारी खोट्या असून सदर व्यक्तीला तडीपार करण्याची मागणी गावकर्‍यांकडून करण्यात येत आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस प्रदिप नागरे व गावकर्‍यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिले आहे. निवेदनात बायगांव खुर्दचे बीट जमादार खोडके यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी न करता सदर १३ लोकांवर गुन्हा दाखल केला. या संदर्भात गावातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांना कुठल्याही प्रकारची विचारपूस न करता परस्पर गुन्हा दाखल केल्याने गावात तणावाचे वातावरण तयार झाले आहे असे म्हटले आहे. बायगाव खुर्द येथील प्रकरणाची माहिती मिळताच प्रदिप नागरे हे अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये आले व त्यांनी सदर १३ व्यक्तींवर खोटे गुन्हे दाखल करु नका अशी मागणी केली. याबाबत त्यांनी पोलीस अधिक्षक यांना निवेदन दिले. गावातील तक्रारकर्त्या मुलीचे वडील शेनफड चतुरसिंग जाधव हा गुंडप्रवृत्तीचा व्यक्ती असून त्याच्यावर आतापर्यंंंत ३0 प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत, केवळ आकसापोटी खोट्या तक्रारी करुन या १३ लोकांना फसविण्यात आल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

Web Title: Tension due to filing of cases against 13 people at Bigaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.