सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:24 AM2021-06-25T04:24:30+5:302021-06-25T04:24:30+5:30

सिम व्हेरिफिकेशनच्या नावावर फसवणूक बुलडाणा : तुमचे सिम कार्ड बंद होणार आहे. डेटा अपडेट करण्यासाठी हा कॉल आहे. त्यासाठी ...

Tenth result of all schools is one hundred percent! | सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के !

सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के !

Next

सिम व्हेरिफिकेशनच्या नावावर फसवणूक

बुलडाणा : तुमचे सिम कार्ड बंद होणार आहे. डेटा अपडेट करण्यासाठी हा कॉल आहे. त्यासाठी तुमचा फोन काहीवेळ बंद ठेवा, असे सांगणारा कॉल जर तुमच्या मोबाइलवर आला, तर सावधान ! ही तुमची फसवणूक असू शकते. इतकेच नव्हे तर सिम कार्ड व्हेरिफिकेशनसाठी कॉल असल्याचे सांगूनही फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.

जिल्ह्यात जनावरांचे लसीकरण रखडले !

बुलडाणा : कोरोना लसीकरण लांबलेले असतानाच, जनावरांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तोंडखुरी, पायखुरी, आदी आजारांपासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना दरवर्षी नोव्हेंबर आणि मे महिन्यांत हे लसीकरण केले जाते.

शाळा सुरू हाेण्याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

बुलडाणा : सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून रुग्णसंख्या कमी हाेत आहे़ लसीकरणाचा वेग वाढविल्यास शाळा सुरू करणे शक्य हाेणार आहे़ दाेन वर्षांपासून घरातच असलेल्या मुलांना शाळा सुरू हाेण्याची प्रतीक्षा आहे़

ग्रामीण भागात नालेसफाईला वेग

मेहकर : ग्रामपंचायतीच्या वतीने मान्सूनपूर्व नाल्यांच्या सफाईचे काम सध्या वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. वॉर्डनिहाय कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली असून, लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे नियोजन दिसून येत आहे.

सातबारावर बोजा असल्याने अडचणी

हिवरा आश्रम : पीक कर्जदार शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर इतर खासगी वित्तीय संस्थांचा बोजा असल्याचे कारण सांगून त्यांना पीक कर्जापासून रोखण्यात येेते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

खंडित वीजपुरवठ्याने ग्रामस्थ त्रस्त

मलकापूर पांग्रा : येथील महावितरणचे ३३ केव्ही सबस्टेशन असले, तरी खासगी आणि कंत्राटी कामगारच येथील कारभार पाहतात. या गावात कायमस्वरूपी लाईनमन नाही. त्यामुळे येथे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो.

वर्षभरात ३२ बालविवाह रोखले

बुलडाणा : गेल्या वर्षभरामध्ये जिल्ह्यात ३२ बालविवाह रोखण्यात जिल्हा यंत्रणेला यश आले आहे. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असला तरी, जिल्ह्यात होणारे बालविवाह चिंताजनक आहेत. प्रशासनाने जनजागृती करण्याची गरज आहे.

पीककर्जाचे पुनर्गठण करण्याची मागणी

किनगाव जट्टू : गतवर्षीपासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच यावर्षी पीककर्ज वाटपात दिरंगाई हाेत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी

धामणगाव बढे : परिसरातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांना बियाणे मिळत नसल्याचे चित्र आहे. पेरणी सुरू हाेण्यापूर्वी प्रशासनाने शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे.

शेणखताकडे वाढला शेतकऱ्यांचा कल

धामणगाव धाड : या वर्षी पाऊस वेळेवर दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्याने खरीपपूर्व शेतीकामांना वेग आला आहे. मशागतीकरिता बैलांऐवजी ट्रॅक्टरचा वापर यंदाच्या हंगामात वाढल्याचे चित्र आहे. रखरखत्या उन्हातही शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे. रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी शेणखताकडे वळल्याचे चित्र आहे़

काेराेनाविषयी जनजागृती करण्याची गरज

बुलडाणा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक ग्रामीण भागातही झाला हाेता़ लोकांमध्ये कोरोनाबाबत बरेच गैरसमज आहेत, भीती आहे. अनेकजण काेराेनाची लागण झाल्यावरही तपासणी करीत नाहीत. त्यामुळे कोरोनाबाबत योग्य जनजागृती करणे गरजेचे आहे, असे मत शिवराज शिक्षण संस्था, अंत्री तेलीचे अध्यक्ष नरेश शेळके यांनी केले.

Web Title: Tenth result of all schools is one hundred percent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.