प्रशासकाचा कार्यकाळ शेतकऱ्यांसाठी अडचणीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 03:01 PM2019-11-20T15:01:25+5:302019-11-20T15:01:39+5:30
बाजार समित्यांचा कारभार ढेपाळल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थीक लूट होत आहे.
- योगेश फरपट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: बुलडाणा जिल्हयातील खामगाव, मलकापूर, मोताळा व सिंदखेडराजा येथील बाजार समित्यांचा कारभार ढेपाळल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थीक लूट होत आहे.
यावर्षी आॅक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने शेतकºयांच्या तोंडातील घास काढला. मूग, उडीद, सोयाबीन, तूर, कपाशीचे पीकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली. काही शेतकºयांनी पिकांचा बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. त्यामुळे थोड्याप्रमाणात का होईना धान्य घरात येवू शकले. सध्या बाजार समितीत सोयाबीन, ज्वारी, मक्याची आवक वाढलेली दिसून येत आहे. मात्र मलकापूर व खामगाव येथील बाजार समितीत हर्राशी करतांना व्यापाºयाकडून शेतकºयांच्या मालाची अक्षरश: थट्टा सुरु केली आहे. सद्यस्थितीत बाजार समिती प्रशासक बसविण्यात आले आहेत. मागील दहा वर्षात बाजार समितीची निवडणुक झालेली नाही. बाजार समितीत जो शेतमाल विक्रीला येतो त्यामध्ये फळ-भाजीपाला, गंगाफळ, कांदे या मालावर अडत घेण्याची तरतूद संपूर्ण आलेली आहे. तरीसुद्धा व्यापाºयाकडून मोठ्या प्रमाणात अडत आकारून व ते पावतीवर न दाखविता वरच्यावर रक्कम दाखविण्यात येवून शेतकºयांची फसवणूक केली जात असल्याच्या घटना घडत आहेत. बाजार समितीत शासनाचे हमीभाव जर व्यापारी देत नसतील व हमी भावापेक्षा कमी भावामध्ये शेतकºयांचा माल घेतल्या जात असल्याचा प्रकार धक्कादायकच आहे. जिल्हाधिकारी यांनी याची दखल घेण्याची ओरड होत आहे.
खामगाव बाजार समितीत असा काही प्रकार नाही. बाजार समितीचा कारभार सुरळीत सुरु आहे. कोणालाही तक्रार असल्यास त्यांनी संपर्क साधावा. उलट आधीपेक्षा चांगला कारभार सुरु आहे. आम्ही शेतकºयांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे.
- महेश कृपलानी, प्रशासक, खामगाव बाजार समिती.
आधीच दुष्काळी परिस्थिती असल्याने जिल्ह्यातील शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांच्या पाठीशी अधिकाºयांनी असायला हवे. व्यापाºयांकडून होणारी आर्थीक लूट न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
- मोहन पाटील, शेतकरी नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना
बाजार समितीवर कोणाचे नियंत्रण नसल्याचा फायदा घेऊन शेतीमालाची व्यापाºयांकडून बाजार समितीत लुट होत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर रित्या कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करून बाजार समिती बंद केल्या जाईल.
- अॅड.साहेबराव मोरे,
शेतकरी नेते, मलकापूर