तेरापंथी आचार्य श्री महाश्रमणजी यांचे सोमवारी खामगावात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 08:42 PM2021-04-17T20:42:39+5:302021-04-17T20:43:09+5:30
Shri Mahashramanji arrives in Khamgaon on Monday कोविड-१९ नियमांचे तंतोतंत पालन करीत, भाविकांना त्यांच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
खामगाव: अंहिसा यात्रेचे प्रणेते तेरा पंथी आचार्य श्री महाश्रमणजी यांचे सोमवार १९ एप्रिल रोजी खामगाव येथे येणार आहेत. स्थानिक देवजी खिमजी मंगल कार्यालयात त्यांचा एकदिवसीय प्रवास राहणार असून, या कालावधीत
कोविड-१९ नियमांचे तंतोतंत पालन करीत, भाविकांना त्यांच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
अणुव्रत आंदोलनाचे प्रचारक आचार्यश्री तुलसी आणि पे्रक्षा प्रणेते आचार्यश्री महाप्रज्ञ यांच्या पंरपरेतील तेरापंथ धर्मसंघाच्या ११ व्या आचार्यांच्या रूपात प्रतिष्ठित असलेल्या आचार्य महाश्रमणजी यांनी सद्भावना, नैतिकता आणि व्यसनमुक्तीच्या प्रचारार्थ तेरा पंथी आचार्य श्री. महाश्रमणजी यांनी अंहिसा यात्रेला सुरूवात केली. या यात्रेचा ५० हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करीत आचार्य महाश्रमणजी यांचे सोमवारी सकाळी खामगाव येथे आगमन होत आहे. स्थानिक देवजी खिमजी मंगल कार्यालयात एक दिवसांचा प्रवासही ते करणार आहे. या कालावधीत कोविड नियमांचे काटेकोर पालन करीत आचार्य महाश्रमणजी यांच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. समाजबांधवांनी आणि भाविकांनी त्यांच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन खामगाव तेरपंथी सभा खामगाव, तेरपंथी महिला मंडळ खामगावच्यावतीने करण्यात आले आहे.