विनाकारण फिरणाऱ्या ७० जणांची केली चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:26 AM2021-04-29T04:26:58+5:302021-04-29T04:26:58+5:30
लाेणार शहरात संचारबंदीचा फज्जा लाेणार : वाढत्या कोरोनाची साखळी खंडित व्हावी, यासाठी शासनाने कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू केली आहे. ...
लाेणार शहरात संचारबंदीचा फज्जा
लाेणार : वाढत्या कोरोनाची साखळी खंडित व्हावी, यासाठी शासनाने कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू केली आहे. सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी वेळ दिला आहे. मात्र, त्यानंतरही अनेक जण विनाकारण फिरत असल्याचे चित्र आहे़
लाॅकडाऊनमुळे माठ विक्रेते संकटात
बुलडाणा : उन्हाळ्यात गरजू व मध्यमवर्गीय कुटुंबीयांना कमी दरात थंड पाण्याची सोय माठाद्वारे होते. यावर्षी लॉकडाऊनमुळे ग्राहक नसल्यामुळे कुंभार अडचणीत सापडले आहेत. शासनाने कुंभार समाजाला मदत देण्याची मागणी हाेत आहे़
अधिवेशनाच्या अध्यक्षपदी गजानन जाधव
देऊळगाव राजा : मराठी प्राध्यापक परिषदेचे २९ एप्रिल रोजी आयोजित ऑनलाइन अधिवेशन चिखली येथे थाटात पार पडणार असून, सदर अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी येथील व्यंकटेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांची निवड करण्यात आली आहे़
जिल्हा सीमांवर वाहनांची कसून तपासणी
डाेणगाव : येथून जवळच असलेल्या वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर पाेलिसांचा बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे़ जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे़ ई-पास असल्याशिवाय वाहनांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येत नसल्याचे चित्र आहे़