टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रीकेत चुकाच चुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 01:46 AM2017-07-23T01:46:48+5:302017-07-23T01:46:48+5:30

बुलडाणा जिल्ह्यात परीक्षार्थ्यांंंंमध्ये गोंधळ; व्याकरणाच्या ५२ चुका आढळल्या.

TET test questions have been frozen | टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रीकेत चुकाच चुका

टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रीकेत चुकाच चुका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाणारी शिक्षकासाठीची पात्नता सिद्ध करणारी "टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट"(टीईटी) २२ जुलै रोजी बुलडाणा येथे २१ केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठीच्या छापील प्रश्नपत्रिकेत व्याकरणाच्या चुकाच चुका आढळून आल्याने शिक्षकांची पात्रता तपासण्याचे काम करणार्‍या यंत्रणेचीच पात्रता तापसण्याची नामुष्की संबंधीत विभागावर ओढावली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने आज घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी जिल्हय़ातून ८ हजार ३२ उमेदवारांपैकी ७ हजार ४२७ इतक्या उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यात पेपर १ साठी ४ हजार ४७४ व पेपर २ साठी २ हजार ९५३ परीक्षार्थींंंंनी परिक्षा दिली. २१ केंद्रावर ही परीक्षा पार पडली. या परिक्षेदरम्यान पेपर एकमध्ये सुमारे १४ तर पेपर दोन मध्ये सुमारे ३८ व्याकरणाच्या चुका आढळून आल्याने परीक्षार्थींमध्ये गोंधळ उडाला होता. एकूण १५0 प्रश्न असलेल्या पेपर दोन मधील प्रश्न क्रमांक ४२ च्या पर्यायामध्ये अठ्ठेचाळीस ऐवजी ह्यअठेचाकीसह्ण असे छापण्यात आले आहे. तर प्रश्न क्र.६४ मध्ये ह्यपायन्यामध्ये, जानेह्ण अशा प्रकारचे दोन्ही पेपर मिळून सुमारे ५२ व्याकरणाच्या चुका असल्याने अनेक परीक्षार्थी गोंधळून गेले होते. टीईटीच्या प्रश्निपत्रकांमध्ये अशा प्रकारच्या घोडचुका होणे ही गंभीर बाब असून शिक्षकांची पात्रता तपासण्यापूर्वी प्रश्नपत्रिकेतील या चुका तपासण्याचे काम संबंधीत विभागाने का केले नाही? असा प्रश्न अनेक परीक्षार्थी उपस्थित करीत आहेत.

शिक्षक पात्रता परीक्षेचा पहिला पेपर १0.३0 वाजता होता. त्यासाठी परीक्षा केंद्रावर अर्धातास अगोदर पोहचणे आवश्यक आहे. कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी १0.३0 वाजता परीक्षा केंद्राचे गेट बंद करण्यात आले. तसेच पेपरमध्ये काही व्याकरणाच्या चुका झाल्या असल्यास त्याची परीक्षा परिषदेकडून चौकशी होईल.
- एन.के.देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा

Web Title: TET test questions have been frozen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.