गजानन महाराज संस्थानकडून आदिवासींना कापड वाटप
By Admin | Published: October 29, 2016 02:42 AM2016-10-29T02:42:27+5:302016-10-29T02:42:27+5:30
७0 हजाराच्यावर आदिवासी बांधवांना दिवाळीनिमित्त कपडे वाटप करण्यात आले.
शेगाव, दि. २८- श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने दिवाळीनिमित्त आदिवासी बांधवांना कपडे वाटप केल्या जातात. यावर्षीदेखील संस्थानच्यावतीने ७0 हजाराच्यावर आदिवासी बांधवांना दिवाळीनिमित्त कपडे वाटप करण्यात आले आहेत.
आदिवासी बांधवांची सहकुटुंब दिवाळी साजरी व्हावी म्हणून शेगाव संस्थानच्यावतीने ३४ वर्षांपासून अविरत नवीन कपड्यांचे वितरण होत आहे. यावर्षीसुद्धा वसाली, अंबाबरवा, चुनखेडी, शेंबा, मांगेरी (मध्यप्रदेश सीमावर्ती भागात) व भिंगारा चाळीस टापरी, गहुमार या आदिवासी भागात व श्री क्षेत्र पंपासरोवर व कपीलधारा या क्षेत्री पुरुष, महिला, लहान-मोठे मुले व मुली अशा एकूण ७0 हजार आदिवासी बांधवांना कपडे वाटप करण्यात आले आहे. संस्थानच्या या उपक्रमाबाबत सर्वत्र कौतुक केले जात आहे.