कापड व्यावसायिकाची शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 10:36 PM2021-06-11T22:36:46+5:302021-06-11T22:36:53+5:30

टूनकी येथील ५५ वर्षीय जुगल किशोर जसराज चांडक हे दूपारी १:३० च्या दरम्यान तपासणीसाठी लॅबवर जात असल्याचे कारण सांगून घरून गेले. मात्र, बराच वेळ घरी परतले नाहीत.

Textile trader commits suicide by jumping into a well | कापड व्यावसायिकाची शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

कापड व्यावसायिकाची शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

Next
ठळक मुद्देटूनकी येथे तीन दिवसात आत्महत्येची दुसरी घटना

बुलडाणा/ संग्रामपूर: संग्रामपूर तालुक्यातील टूनकी येथे शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास एका कपडा व्यावसायिकाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

टूनकी येथील ५५ वर्षीय जुगल किशोर जसराज चांडक हे दूपारी १:३० च्या दरम्यान तपासणीसाठी लॅबवर जात असल्याचे कारण सांगून घरून गेले. मात्र, बराच वेळ घरी परतले नाहीत. दरम्यान ललित चांडक यांच्या शेतातील विहिरीत जुगल किशोर चांडक यांचा मृतदेह काही ग्रामस्थांना आढळून आला. घटनेची माहिती प्राप्त होताच सोनाळा पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत विहिरीतील शव बाहेर काढले. नितीन विजय चांडक याच्या फिर्यादीवरून सोनाळा पोलिस स्टेशनला अकास्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पुढील तपास टूनकी बिटचे बिट जमदार मोहिनोद्दीन सैय्यद करीत आहेत. टुनकी गावात तीन दिवसात दोन आत्महत्येच्या दोन घटना घडल्या. ८ जून रोजी येथील एका युवकाने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली

Web Title: Textile trader commits suicide by jumping into a well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.