ठाकूर जमात राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत वर्गीकृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:38 AM2021-09-22T04:38:29+5:302021-09-22T04:38:29+5:30
महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाशी संलग्न असलेले सामाजिक कार्यकर्ते येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक जगन्नाथ गिते यांनी भारत सरकारच्या ...
महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाशी संलग्न असलेले सामाजिक कार्यकर्ते येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक जगन्नाथ गिते यांनी भारत सरकारच्या आदिवासी जनजाती मंत्रालयाकडे केलेल्या पत्रव्यवहारानुसार जनजातीय मंत्रालयाने महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव यांना संबंधित निवेदन पुढील कार्यवाहीसाठी पाठविलेले आहे. त्यानुसार ठाकूर, ठाकर, का ठाकूर, मा ठाकूर, मा ठाकर या जमाती महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक ४४ वर वर्गीकृत आहेत, असे पुन्हा एकदा स्पष्टपणे नमूद
करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील आदिवासी ठाकूर जमातीच्या लोकांना अल्प लोकसंख्या असल्याने व राजकीय नेतृत्व नसल्याने आदिवासी विकास विभागातर्फे खरे-खोटे आदिवासींच्या नावाने आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळू नये, म्हणून प्रकरण प्रलंबित ठेवण्यास भाग पाडले जाते. प्रत्येक उमेदवारांना उच्च न्यायालयाकडून वैधता मिळवावी लागत आहे. गोरगरीब ठाकुरांना यामुळे आर्थिक व शारीरिक
जाचास सामोरे जावे लागत आहे. याविरोधात अशोक गिते यांनी केंद्र सरकारच्या आदिवासी मंत्रालयाकडे पाठवलेल्या निवेदनाची दखल घेतली गेली आहे. यापूर्वी महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र ठाकूर, सरचिटणीस रणजित शिंदे यांच्या तसेच ठाकूर जमात संरक्षण समिती शेगावचे तत्कालीन अध्यक्ष विजय इंगळे, सामाजिक कार्यकर्ते गजानन इंगळे यांच्या पत्रव्यवहाराची केंद्रीय जनजातीय मंत्रालयाने दखल घेत १६ एप्रिल २०१४, ६ नोव्हेंबर २०१३ रोजीच्या पत्रानुसार महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाला स्पष्ट निर्देश दिलेले होते.