आधी लगीन लोकशाहीचे; नवरदेवाने स्वतःच्या विवाहपूर्वी बजावला मतदानाचा हक्क
By अनिल गवई | Published: April 26, 2024 10:42 AM2024-04-26T10:42:12+5:302024-04-26T10:45:04+5:30
Lok Sabha Election 2024 : शतप्रतिशत मतदानासाठी प्रशासनाकडून प्रयत्न प्रयत्न केले जात आहे.
खामगाव: लोकशाहीचा लोकोत्सव सर्वत्र साजरा होत असताना शुक्रवारी स्वतःच्या लग्नापूर्वी मतदानाचा हक्क बजावून एका नवरदेवाने आधी लग्न लोकशाहीचे असा असा प्रत्यात मतदानाचा हक्क बजावला. खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथे लग्न पूर्वी नवरदेवाने मतदान केले.
शतप्रतिशत मतदानासाठी प्रशासनाकडून प्रयत्न प्रयत्न केले जात आहे. राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते देखील यासाठी प्रयत्नशील आहेत. हिवरखेड येथे लग्नाला जाण्यापूर्वी अमर विश्वनाथ बावणे या नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी मुंबई येथील महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनचे संचालक अशोकराव हटकर यांनी दुचाकी वरून नवरदेवाला मतदानासाठी नेले. यावेळी मंगेश काळे, महादेव हटकर, संदीप हटकर, महादेव टिकार, तलाठी आनंद वानखेडे उपस्थित होते.