बस न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी अडवली बस; माेताळा येथील प्रकार
By संदीप वानखेडे | Published: August 25, 2023 07:15 PM2023-08-25T19:15:32+5:302023-08-25T19:15:43+5:30
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी माेताळा शहरात शिक्षण घेण्यासाठी येतात़ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बस मिळत नसल्याने खासगी वाहनांनी प्रवास करावा लागताे़
बुलढाणा : पाेलिसांनी काढली विद्यार्थ्यांची समजूत मोताळा : शासनाने विविध सवलती जाहीर केल्यामुळे बसमध्ये गर्दी वाढली आहे़ दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वच आगारांमध्ये बसची संख्या प्रवाशांची संख्या पाहता ताेकडी ठरत आहेत़ त्यामुळे, विद्यार्थ्यांना बसच मिळत नसल्याचे चित्र जिल्हाभरात आहे़ मोताळा बसस्थानकावर २५ ऑगस्ट दुपारी ३़ ३० वाजता विद्यार्थी बसची प्रतीक्षा करीत हाेते़ बराच वेळ झल्यानंतरही बस मिळाली नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यानी बस अडवून आंदाेलन सुरू केले़ अखेर पाेलिसांनी विद्यार्थ्यांनी समजूत काढल्याने आंदाेलन मागे घेण्यात आले.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी माेताळा शहरात शिक्षण घेण्यासाठी येतात़ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बस मिळत नसल्याने खासगी वाहनांनी प्रवास करावा लागताे़ दरराेज बस वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थी ताटकळत बसतात़ हा प्रकार दरराेजचा आहे़ मोताळा ते नांदुरा मार्गावरील गावातील विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी बस उपलब्ध नव्हती. उपलब्ध बसमध्ये जागा नसल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संतप्त झाले़ त्यांनी बस स्थानकातच बुलढाणा-जळगाव जामोद बस क्रमांक एम.एच. ३० एक्यु ६३३८ बस अडवत आंदोलन केले.
संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने तात्काळ बोराखेडी पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पीएसआय घुले, पोलीस कर्मचारी थोरात,पैठणे, सुर्यवंशी, सुरडकर, पवार,चालक पंडित, खर्चे होमगार्ड सोनुने यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत संतप्त विद्यार्थ्यांची समजुत काढली़ तसेच वाहतूक नियंत्रक एस.आर.मोरे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दुसरी बस करून देत विद्यार्थ्यांना शांत केले़ अखेर बुलढाणा - जळगाव जामोद बस पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली़