बुलढाणा जिल्ह्यात गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा, सकाळी १०़ ३० वाजताच सोशल मीडियावर झाला व्हायरल 

By संदीप वानखेडे | Published: March 3, 2023 02:23 PM2023-03-03T14:23:34+5:302023-03-03T14:24:22+5:30

12 th Paper leak: इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेच्या गणिताचा पेपर ३ मार्च राेजी सकाळी १०़ ३० वाजताच समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे़ या प्रकरणी दाेषीवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

The discussion of math paper leak in Buldhana district went viral on social media at 10:30 am | बुलढाणा जिल्ह्यात गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा, सकाळी १०़ ३० वाजताच सोशल मीडियावर झाला व्हायरल 

बुलढाणा जिल्ह्यात गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा, सकाळी १०़ ३० वाजताच सोशल मीडियावर झाला व्हायरल 

googlenewsNext

- संदीप वानखडे

बुलढाणा :  इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेच्या गणिताचा पेपर ३ मार्च राेजी सकाळी १०़ ३० वाजताच समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे़ या प्रकरणी दाेषीवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

जिल्ह्यात ११३ केंद्रावर ३१ हजाराच्यावर विद्यार्थी परीक्षा देत आहे़  इयत्ता १२वीच्या विज्ञान शाखेच्या गणित विषयाचा पेपर ३ मार्च घेण्यात आला़ हा पेपर सकाळी ११ वाजता सुरू हाेणार असताना सिंदखेड राजा तालुक्यातील एका परिक्षा केंद्रावरून हा पेपर सकाळी १०़ ३० वाजता समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आल्याची चर्चा आहे़  त्यामुळे, जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे़  दरम्यान, पेपर फुट प्रकरणाची शिक्षण विभागाने चाैकशी सुरू केली असून दाेषींवर  कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले़ यंदा काॅपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागासह राज्य शासनाने विविध उपाय याेजना केल्या आहेत़ बैठ्या पथकांसह भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ मात्र, तरीही हा पेपर फुटल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे़

Web Title: The discussion of math paper leak in Buldhana district went viral on social media at 10:30 am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.