चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दरीत काेसळली, २५ विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

By संदीप वानखेडे | Published: August 16, 2023 09:48 AM2023-08-16T09:48:01+5:302023-08-16T09:48:13+5:30

चिखली ते सवणा रस्त्यावरील वळती गावाजवळील घटना : पाच ते सहा विद्यार्थी गंभीर 

The driver lost control and the bus plunged into a valley, injuring 40 passengers including 25 students | चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दरीत काेसळली, २५ विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दरीत काेसळली, २५ विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

googlenewsNext

सवणा : येथून चिखलीकडे येत असलेली बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजुला असलेल्या १० फुट दरीत काेसळली. यामध्ये २५ विद्यार्थ्यासह ४० प्रवाशी जखमी झाले. त्यापैकी पाच ते सहा मुले गंभीर जखमी झाले. ही घटना चिखली ते सवणा रस्त्यावर वळती गावाजवळ सकाळी घडली. अपघाताची माहिती मिळताच पालकांनी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली हाेती. 

सवणा येथून बस क्र. एमएच २० डी ९३६७ ही चिखली येथे जात हाेती. दरम्यान, वळती येथील प्रवाशी घेतल्यानंतर बस काही अंतरावर गेल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे, बस रस्त्याच्या बाजुला असलेल्या १० फुट दरीत काेसळली. या बसमध्ये चिखली येथे खासगी शिकवणीसाठी जात असलेले २५ विद्यार्थ्यांसह वृद्ध व इतर असे ४० प्रवाशी जखमी झाले आहेत. यापैकी पाच ते सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या जखमी विद्यार्थ्यांना तातडीने चिखली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून या विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Web Title: The driver lost control and the bus plunged into a valley, injuring 40 passengers including 25 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात