आधाराशिवाय उभेही राहता येईना, नंतर पूर्ण केली मॅरेथॉन; बुलडाण्यातील डॉक्टर महिलेने केली कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 06:28 AM2022-03-07T06:28:34+5:302022-03-07T06:28:41+5:30

लाँग कोविडदरम्यान त्या तीन महिने व्हीलचेअरवर होत्या. केवळ इच्छाशक्ती व मानसिक कणखरपणाच्या जोरावर हाफ मॅरेथॉनमध्ये धावल्या.

The female doctor in Buldana did the maximum on the strength of will; Can't stand without support, then completed marathon | आधाराशिवाय उभेही राहता येईना, नंतर पूर्ण केली मॅरेथॉन; बुलडाण्यातील डॉक्टर महिलेने केली कमाल

आधाराशिवाय उभेही राहता येईना, नंतर पूर्ण केली मॅरेथॉन; बुलडाण्यातील डॉक्टर महिलेने केली कमाल

googlenewsNext

- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : लाॅंग कोविड झाला. दुसऱ्याच्या आधाराशिवाय त्यांना उभेही राहता येत नव्हते. वर्षभरापूर्वी ही स्थिती अनुभवणाऱ्या एका महिला डॉक्टरने गेल्याच आठवड्यात इंटरनॅशनल हाफ मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केली. प्रबळ जिद्दीच्या बळावर त्यांनी ही शारीरिक तंदुरुस्ती मिळवली. 

डॉ. अश्विनी जाधव असं त्यांचं नाव. त्या मूळच्या मुंबईच्या. लग्नानंतर बुलडाण्यात सासरी आल्या. आधी त्यांना गेल्या वर्षी २६ मार्चला कोरोना झाला. त्यानंतर त्या लाॅंग कोविडला सामोऱ्या गेल्या. आधाराशिवाय त्यांना उभे राहता येत नव्हते. वर्षभरात त्यांनी त्यावर मात केली आणि २७ फेब्रुवारी रोजी पुण्यात झालेली इंटरनॅशनल हाफ मॅरेथॉन (२१ किमी) २ तास ५० मिनिटांमध्ये पूर्ण करत शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित केले.

लाँग कोविडदरम्यान त्या तीन महिने व्हीलचेअरवर होत्या. केवळ इच्छाशक्ती व मानसिक कणखरपणाच्या जोरावर हाफ मॅरेथॉनमध्ये धावल्या. डॉ. अश्विनी यांनी ५२ दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या जवळच्या गर्भवती नातेवाईकाचे मरण बघितले. त्याचा त्यांना जबर मानसिक धक्का बसला होता. परंतु, त्यातून सावरत त्यांनी लाँग कोविडवर मात केली. शारीरिक तंदुरुस्तीला प्राधान्य दिले. प्रारंभी साधे १०० मीटर चालणेही अवघड होते. आधी कार्डियाक फिटनेसला प्राधान्य दिले. तीन इको नॉर्मल आल्यानंतर त्यांनी चालण्यास सुरूवात केली. दोन किलोमीटर दररोज चालल्यानंतर आत्मविश्वास दुणावला आणि त्यांनी जीम सुरू केली. त्यानंतर धावण्याची आवड असलेले पती डॉ. विनोद जाधव यांच्यासमवेत त्यांनी धावण्याचा सराव सुरू केला. त्यात त्यांना आवड निर्माण झाली व आयुष्यात प्रथमच थेट पुणे इंटरनॅशनल हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होत ही स्पर्धा पूर्णही केली.

डॉक्टर ॲण्ड फिटनेस ग्रुपची मदत
सोशल मीडियावरील देशातील ३० हजार डॉक्टरांच्या ग्रुपमधील ॲक्टिव्हिटी पाहून त्यांनाही काहीतरी वेगळं करण्याची उत्सुकता लागली. याच ग्रुपमधील दिल्लीतील डॉ. अभिषेक राज आणि टेक्सासमधील डल्लास येथील डॉ. आदित्य शर्मा यांनी त्यांना ऑनलाईन कोचिंग दिले.

Web Title: The female doctor in Buldana did the maximum on the strength of will; Can't stand without support, then completed marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.