नदीचा प्रवाह अडविला, पुराने पाणी गावात शिरण्याची शक्यता
By विवेक चांदुरकर | Published: June 9, 2024 04:04 PM2024-06-09T16:04:20+5:302024-06-09T16:04:40+5:30
इंग्रजकालीन पूल पडून नवीन पुलाचे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम करीत असतांना गावातील येणारे सांडपाणी अडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मातीचा ढीग लावून नदीपात्र अडविण्यात आले आहे.
बावनबीर येथील इंदिरा गांधी विद्यालयासमोर नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. पुलाचे बांधकाम करण्याकरिता दोन्ही बाजुने नदीचा प्रवाह माती टाकून अडविण्यात आला आहे. पुलाचे बांधकाम संथगतीने केल्या जात असल्याने पुराचे पाणी गावात व शेतकऱ्यांच्या शेतात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
इंग्रजकालीन पूल पडून नवीन पुलाचे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम करीत असतांना गावातील येणारे सांडपाणी अडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मातीचा ढीग लावून नदीपात्र अडविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे पुलाच्या दुसऱ्या बाजूला नदीपात्रात माती टाकून वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग काढण्यात आला आहे. त्यामुळे नदीचा प्रवाह दोन्ही बाजुनी पूर्णपणे अडविल्या गेला आहे. सध्या पावसाला सुरुवात झाली असून नदीला पूर येण्यापूर्वी नदीपात्रात टाकण्यात आलेला मातीचा ढीग न हटविल्यास पुराचे पाणी गावात शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुलाच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरून मोठे नुकसान होण्याची भीती गावकऱ्यांना भेडसावत आहे. त्यामुळे नदीला पूर येण्यापूर्वी नदी पात्राचा प्रवाह सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
नदीच्या प्रवाहत मातीचा भराव टाकण्यात आला आहे. आता पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. जोरदार पाऊस आल्यास नदिच्या पुराचे पाणी गावात शिरून नुकसान होवू शकते. तसेच पुराच्या पाण्याचा गावकर्यांना व शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे त्वरीत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.
- राहुल् मनसुटे