जालना जिल्ह्यातील घटनेचे बुलढाण्यात पडसाद; सकल मराठा आक्रमक

By ब्रह्मानंद जाधव | Published: September 2, 2023 06:58 PM2023-09-02T18:58:15+5:302023-09-02T18:58:38+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

The incident in Jalna district has repercussions in Buldhana; Gross Maratha aggression | जालना जिल्ह्यातील घटनेचे बुलढाण्यात पडसाद; सकल मराठा आक्रमक

जालना जिल्ह्यातील घटनेचे बुलढाण्यात पडसाद; सकल मराठा आक्रमक

googlenewsNext

बुलढाणा : जालना जिल्ह्यात मराठा समाजावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यात उमटले. शनिवारी सकल मराठा समाजाने घटनेचा निषेध नोंदवीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निदर्शने केली. मराठा समाज शांत आहे, अंतपाहु नका अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

जालना जिल्ह्यात संविधानीक मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाज आंदोलकांवर पोलीसांनी बळाचा वापर केला. या घटनेने राज्याचे राजकारण ढवळून निघत असताना बुलढाण्यात सकल मराठा समाजाने तिव्र निदर्शने करीत निषेध व्यक्त केला. झालेली घटना पूर्वनियोजीत आहे की, कसे याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा समाजाचे वेगवेगळ्या स्तरातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी निवेदन देताना सार्वजनिक शिवजयंती उत्सव समतीचे डॉ. शोन चिंचोले, सुनिल सपकाळ, डी. एस. लहाने, सुनिल जवंजाळ, राजेश हेलगे, सागर काळवाघे, दत्ता काकस, ॲड. विजय सावळे, नरेश शेळके, अमोल रिंढे, संजय हाडे, गणेश निकम, गणेश उबरहंडे, ॲड. राज देवकर, ॲड. संदिप ठेंग, ॲड. अमर इंगळे, प्रा. रामदास शिंगणे, डॉ. पुरुषोत्तम देवकर, प्रा. अनुजा सावळे, वंदना निकम, अनिल बावस्कर, मनिष बोरकर, सचिन परांडे, आशीष गायकी, विशाल फदाट, गौरव देशमुख, संभाजी पवार, आशीष काकडे, नीलेश हरकळ, नितीन कानडजे, विनय मोटे, दीपक मोरे, रमेश बुरकूल, लक्ष्मण ठाकरे आदी उपस्थित होते.

शासन आपल्या दारी कार्यक्रम रद्द करा
राज्यात वातावरण बिघडत चालले आहे. मराठा समाज संतप्त आहे. अशावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्ह्यात येत आहे. घटनेची तिव्रता पाहुण हा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी मागणी आहे. – सुनिल जवंजाळ पाटील, मराठा समाज नेते.

या घटनेचा निषेध
मराठा समाजावर झालेला लाठी हल्ला निषेधार्थ आहे. याचा निषेध करावा तेव्हढा कमी आहे. मी याचा निषेध करतो. अमानुष मारहान प्रकरणाची सखोल चौकशी करावी, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. – डॉ. शोन चिंचोले, अध्यक्ष सार्वजनिक शिवजयंती समिती, बुलढाणा.

Web Title: The incident in Jalna district has repercussions in Buldhana; Gross Maratha aggression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.