संशयित म्हणून ताब्यात घेतलेले दोघे निघाले अट्टल गुन्हेगार
By अनिल गवई | Published: July 12, 2024 10:20 PM2024-07-12T22:20:15+5:302024-07-12T22:20:27+5:30
शहर पोलिसांनी गुन्हा करण्याच्या उद्देशाने चकरा मारणाऱ्या दोघांना बुधवारी दुपारी ताब्यात घेतले. या संशयितांची कसून चौकशी केली असता ते दोघे अट्टल गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्या विरोधात विविध पोलिस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.
खामगाव : शहरातील नांदुरा रोडवरील महाराष्ट्र बँकेच्या परिसरात गुन्हा करण्याच्या उद्देशाने आढळून आलेले आणि संशयित म्हणून ताब्यात घेतलेले दोघेही अट्टल गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले आहे.
शहर पोलिसांनी गुन्हा करण्याच्या उद्देशाने चकरा मारणाऱ्या दोघांना बुधवारी दुपारी ताब्यात घेतले. या संशयितांची कसून चौकशी केली असता ते दोघे अट्टल गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्या विरोधात विविध पोलिस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. चंदू राजेश बोई (वय ३२) आणि गणेश राजू बोई (वय १९) अशी त्यांची नावे आहेत. ते गुन्हेगार असल्याचे निदर्शनास
आले. त्या दोघांवर वाशिम, बार्शीटाकळी, यवतमाळ, सोलापूर, बीड, परभणी, पुसद यासह विविध ठिकाणी चोरी आणि बॅग चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. वाशिम येथे दोन बॅग चोरीच्या गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे चंदू राजेश बोई व गणेश राजू बोई दोन्ही (रा. नाशिक सराई फाटा झोपडपट्टी) या दोघांना वाशिम येथील एलसीबी पथकाचे पोलिस नाईक ज्ञानदेव म्हात्रे, पोकॉ विठ्ठल, दीपक घुगे यांनी गुरूवारी खामगाव येथे येऊन ताब्यात घेतले.
ही कारवाई खामगाव शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक प्रवीण नाचणकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय विनोद खांबलकर, पोकॉ राम धामोडे, अंकुश गुरूदेव, सागर भगत, गणेश कोल्हे, राहुल धारकर यांनी केली.