राज्यातील आरक्षण आंदोलनात घुमला नारीशक्तीचा आवाज...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 06:08 AM2023-09-10T06:08:07+5:302023-09-10T06:08:39+5:30

मराठा समाजबांधवांच्या संतप्त भावना, पुढाऱ्यांना गावाचा इशारा, मागणी पूर्ण होईपर्यंत गावबंदी

The voice of women's power rang out in the reservation movement in the state... | राज्यातील आरक्षण आंदोलनात घुमला नारीशक्तीचा आवाज...

राज्यातील आरक्षण आंदोलनात घुमला नारीशक्तीचा आवाज...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांकडून राज्यभरात आंदोलने सुरूच असून शनिवारीही ठिकठिकाणी आंदोलनाची धग कायम होती. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा येथील स्मशानभूमीत तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरू होते. परभणी तालुक्यातील मांडाखळी येथे मुंडन आंदोलन तर इतर ठिकाणी लाक्षणिक उपोषण होते. बुलढाणा जिल्ह्यातही काही भागात समाजबांधवांनी ठिय्या आंदोलन करून जोरदार 
घोषणाबाजी केली.

महिलेचे उपोषण, तरुणांनी केले मुंडण 
आरक्षणाच्या मागणीसाठी बार्शी तालुक्यातील सासुरे (जि. सोलापूर) येथील वैशाली आवारे यांनी गावातच  उपोषण सुरू केले आहे. तर घाणेगाव येथे तरूणांनी मुंडण आंदोलन केले. 

शाळा, महाविद्यालये बंद 
लातूर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शनिवारी पुकारण्यात आलेल्या बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्गातही दिवसभर शुकशुकाट होता.

ग्रामसभा घेऊन सर्वानुमते ठराव  
धाराशिव :  तालुक्यातील मेडसिंगा गावात झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्याचे निश्चित करतानाच यापुढे राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा ठराव घेण्यात आला. आरक्षण मिळेपर्यंत ही गावबंदी कायम राहणार आहे.

ठाणे बंदची हाक
सकल मराठा मोर्चाच्या वतीने सोमवारी ठाणे बंद पुकारला आहे. या संदर्भात ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन एकमताने घेण्यात आला.   

 

Web Title: The voice of women's power rang out in the reservation movement in the state...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.