राऊतवाडी स्मशानभूमीतील साहित्याची चोरी व नासधूस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:35 AM2021-02-24T04:35:57+5:302021-02-24T04:35:57+5:30

राऊतवाडीतील स्मशानभूमी उजाड ओसाड न ठेवता त्यास सर्वांगसुंदर बनविण्याचा ध्यास घेत या प्रभागाच्या नगरसेविका प्रा.डॉ.मीनल गावंडे ह्या अध्यक्ष असलेल्या ...

Theft and destruction of materials in Rautwadi cemetery! | राऊतवाडी स्मशानभूमीतील साहित्याची चोरी व नासधूस !

राऊतवाडी स्मशानभूमीतील साहित्याची चोरी व नासधूस !

googlenewsNext

राऊतवाडीतील स्मशानभूमी उजाड ओसाड न ठेवता त्यास सर्वांगसुंदर बनविण्याचा ध्यास घेत या प्रभागाच्या नगरसेविका प्रा.डॉ.मीनल गावंडे ह्या अध्यक्ष असलेल्या राजमाता जिजाऊ अर्बन संस्थाने यात विशेष पुढाकार घेतला आहे. सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य डॉ.नीलेश गावंडे यांनी स्मशानभूमी सर्व सोयींनी युक्त करून स्मशानभूमीला पर्यटनस्थळाचे स्वरूप देवून समाजापुढे नवा आदर्श निर्माण करण्याचा ध्यास घेतला आहे. या कामी ते अतिशय गांभीर्याने लक्ष ठेवून आहेत. याअंतर्गत स्मशानभूमीत बांधकाम, सरणावर शेड आदी कामे सुरू असताना रात्रीच्यावेळी बांधकामाचे साहित्य, लोखंड आदी साहित्य सातत्याने चोरीला जात आहे. मात्र लहान-मोठ्या चोऱ्यांकडे दूर्लक्ष करून प्रा.गावंडे यांनी आपले काम सुरू ठेवले होते. सोमवारी रात्री अत्यंत निंदनीय प्रकार घडला. स्मशानभूतील सामान पुन्हा चोरीला गेले, सोबतच चोरट्यांनी तीन शेड उद्धवस्त करून टाकले. अखेरच्या अंत्यसंस्कराला माणसाचे कर्तव्य सदैव जागृत असावे, यासाठी निस्वार्थ भावनेतून राजमाता जिजाऊ अर्बन व पालिका प्रशासनाने हाती घेतलेल्या या कामाला, काही हिन प्रवृत्तींकडून अशाप्रकारे बाधा पोहचणे व चांगल्या कामाला विरोध करून नासधूस करण्याच्या या प्रकाराबद्दल संताप व्यक्त होत आहे. या प्रकाराबाबत प्राचार्य डॉ.नीलेश गावंडे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्याशी चर्चा केली असून मुख्याधिकाऱ्यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेत पाेलिस तक्रार करणार असल्याचे सांगितले.

कठोर कारवाई करा !

एका चांगल्या हेतूने व निस्वार्थ भावनेने स्मशानभूमीचे रूपडे पालटले जात असताना अज्ञात समाजकंटकांकडून हेतूपुरस्सरपणे स्मशानभूमील साहित्य लंपास करणे व दहन शेडची नासधूस करण्याचे काम झाले असल्याने शहरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासह भविष्यात कोणीही अशाप्रकारची कृती करू नये, यासाठी या प्रकारास कारणीभूत भामट्यांचा तातडीने शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी शहरवासीयांकडूून होत आहे.

Web Title: Theft and destruction of materials in Rautwadi cemetery!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.