बियरबारमध्ये चोरी; चोरट्यास आवरता आला नाही मद्यप्राशनाचा मोह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 11:29 AM2020-12-13T11:29:34+5:302020-12-13T11:32:05+5:30

Buldhana Crime News विदेशी दारू बॅगमध्ये भरल्यानंतर तेथेच  पेग घेण्याचा मोहही चोरट्यास आवरता आला नाही.

Theft at the beer bar; The thief could not resist the temptation to drink | बियरबारमध्ये चोरी; चोरट्यास आवरता आला नाही मद्यप्राशनाचा मोह

बियरबारमध्ये चोरी; चोरट्यास आवरता आला नाही मद्यप्राशनाचा मोह

Next
ठळक मुद्देसंपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तब्बल १ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला.

लोकमत न्यूज नेटवर्क
धाड :  येथील एका बियरबारमध्ये अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाख ३९ हजार रुपये किमतीची दारू चोरी केल्याची घटना ११ डिसेंबर राजी उघडकीस आली. विशेष म्हणजे या बियरबारमधील किमती विदेशी दारू बॅगमध्ये भरल्यानंतर तेथेच  पेग घेण्याचा मोहही चोरट्यास आवरता आला नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बुलडाणा-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर धाड गावापासून एक किलोमीटर अंतरावर राजेश आसाराम मालवे  यांचा बियरबार आहे. १० डिसेंबरला येथील कामकाज आटोपल्यानंतर ते व तेथील नोकर हे घरी निघून गेले होते. दरम्यान, मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बियरबारची सिमेंट व लाकडी दरवाजाच्या कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. सोबतच हॉटेलच्या शोकेसमध्ये ठेवलेल्या नामांकित कंपनीची विदेशी दारू बॅगमध्ये भरली. त्यानंतर आपला मोर्चा गुदामाकडे वळवून दोन्ही ठिकाणांवरून तब्बल १ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. या चोरीदरम्यान बियरबारमध्येच एका चोरट्याने पेग मारला. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असल्याने त्यात हे उघड झाले. राजेश मालवे यांनी पोलिसात तक्रार दिली.


चोरटे ‘’सीसी’’ कॅमेऱ्यामध्ये  झाले कैद
हॉटेलमालक मालवे यांनी हॉटेल परिसर व हॉटेलमध्ये ‘’सीसीटीव्ही’’ कॅमेरे लावले आहेत. या कॅमेऱ्यात चोरट्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केल्यापासून ऐवज घेऊन पोबारा केल्यापर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम कैद झालेला आहे. तसेच एका चोरट्याचा चेहराही कॅमेऱ्याने स्पष्ट टिपला आहे. त्यामुळे गुन्ह्याची लवकरच उकल होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Theft at the beer bar; The thief could not resist the temptation to drink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.