खामगावात एकाच कॉम्प्लेक्स मधील ६ दुकाने फोडली; चोरटे झाले सीसी कॅमेऱ्यात कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 01:16 PM2018-01-08T13:16:09+5:302018-01-08T13:18:15+5:30
खामगाव : गत तीन महिन्यापासून शहरात चोरीचे सत्र सुरुच असून रविवारच्या रात्री नगरपरिषदेच्या वर्दळीच्या रस्त्यावरील कॉम्प्लेक्स मधील ६ दुकाने फोडल्याची घटना घडली.
खामगाव : गत तीन महिन्यापासून शहरात चोरीचे सत्र सुरुच असून रविवारच्या रात्री नगरपरिषदेच्या वर्दळीच्या रस्त्यावरील कॉम्प्लेक्स मधील ६ दुकाने फोडल्याची घटना घडली. सीसीटीव्ही कॅमेºयात तोंडाला रुमाल बांधलेली महिला व पुरुष कैद झाले आहेत. या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बसस्थानक ते जलंब नाका हा रस्ता शहरातील सर्वात वर्दळीचा रस्ता आहे. रात्री उशिरापर्यत या रस्त्याने वाहनांची ये जा सुरु असते. अशामध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकूलातील सहा दुकाने फोडून चोरी झाली. सुदैवाने जादा रक्कम कुणाच्या दुकानात नसल्याने मोठे नुकसान झाले नाही. तसेच गावात सुद्धा इतर तीन ठिकाणी चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या चोरीच्या घटनांनी दुकानदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिलेकडून चोरी !
या चोरीमध्ये महिलेसह अन्य काही चोरट्यांचा समावेश असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून तपास सुरु केला आहे.