मेहकरमधील इलेक्ट्रीकल दुकानात चोरी; साडेचार लाख रुपये लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 16:29 IST2018-03-19T16:29:43+5:302018-03-19T16:29:43+5:30
मेहकर : शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका इलेक्ट्रीकल दुकानातून अज्ञात चोरट्याने मध्यरात्री रोख साडेचार लाख रुपये लंपास केल्याची घटना १९ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली.

मेहकरमधील इलेक्ट्रीकल दुकानात चोरी; साडेचार लाख रुपये लंपास
मेहकर : शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका इलेक्ट्रीकल दुकानातून अज्ञात चोरट्याने मध्यरात्री रोख साडेचार लाख रुपये लंपास केल्याची घटना १९ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शहरातील मुख्य रस्त्यालगत वैभव गजानन बोडखे यांच्या मालकीचे बोडखे एजन्सी हे दुकान आहे. अज्ञात चोरट्याने १८ मार्च रोजी मध्यरात्री दुकानाच्या शटरचा कोंडा तोडून दुकानात प्रवेश केला. सोबतच दुकानात ठेवलेले रोख चार लाख ५५ हजार रुपये चोरून नेले. १९ मार्च रोजी सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. प्रकरणी लगोलग मेहकर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक भोसले यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केली. याप्रकरणी वैभव गजानन बोडखे (रा. मेहकर) यांनी पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास मेहकर पोलिस करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)