५३२२५ मतदारांचे छायाचित्रच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:35 AM2021-04-04T04:35:38+5:302021-04-04T04:35:38+5:30
२३ मार्च होती अंतिम मुदत भारत निवडणूक आयोगाने वारंवार ज्या मतदारांची मतदार यादीमध्ये छायाचित्रे नाहीत, अशा मतदारांना छायाचित्र संबंधित ...
२३ मार्च होती अंतिम मुदत
भारत निवडणूक आयोगाने वारंवार ज्या मतदारांची मतदार यादीमध्ये छायाचित्रे नाहीत, अशा मतदारांना छायाचित्र संबंधित बीएलओ अर्थात केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे कळविले आहे. बुलडाणा तालुक्यातील सर्व मतदार याद्या १५ जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मात्र, बऱ्याच मतदारांनी छायाचित्र सादर केलेले नाही, अशा मतदारांकडे बीएलओंनी घरी जाऊन छायाचित्राची मागणी केली. तरीही या मतदारांकडून छायाचित्र बीएलओकडे सादर केले नाही. मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांना २३ मार्चपर्यंत संबंधित बीएलओकडे छायाचित्र सादर करण्यासाठी अंतिम मुदत दिली होती; परंतु ज्यांनी छायाचित्रे दिली नाहीत, अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येत आहेत, असे बुलडाणा तहसीलदारांनी कळविले आहे.
विधानसभानिहाय आकडेवारी
विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार छायाचित्र नसलेले मतदार
मलकापूर २६८३६४ ८७२
बुलडाणा ३०८६३८ १८४७०
चिखली २९६४८२ १०६९३
सिंदखेड राजा ३१३०४६ ९२९८
मेहकर २९०५२७ ३५३३
खामगाव २८२६१५ ३७९३
जळगाव जा. २९४७१२ ६६६६
जिल्ह्यातील मतदार - २०५४४१४
छायाचित्र नसलेले मतदार - ५३२२५