‘ई-पास’साठी कारणं दोनच; रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:56 AM2021-05-05T04:56:20+5:302021-05-05T04:56:20+5:30

ई-पाससाठी असा करावा अर्ज ई-पास हवा असलेल्या नागरिकांनी कोविड १९ महापोलीसच्या वेबसाइटवर जाऊन ज्या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे, त्या ...

There are two reasons for e-pass; Hospital or funeral! | ‘ई-पास’साठी कारणं दोनच; रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार!

‘ई-पास’साठी कारणं दोनच; रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार!

Next

ई-पाससाठी असा करावा अर्ज

ई-पास हवा असलेल्या नागरिकांनी कोविड १९ महापोलीसच्या वेबसाइटवर जाऊन ज्या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे, त्या पोलीस आयुक्तालय अथवा जिल्हा पोलीस विभाग निवडावा. त्यानंतर स्वतःचे नाव, कोणत्या तारखेपासून प्रवास करायचा आहे ते लिहून, मोबाइल क्रमांक, प्रवासाचे कारण, वाहन क्रमांक, सध्याचा पत्ता, ई-मेल, प्रवास प्रारंभ ठिकाण ते अंतिम ठिकाण, सोबतच्या प्रवाशांची संख्या याची माहिती द्यावी. त्यानंतर स्वतःचा फोटो, आधार कार्ड, मेडिकल रिपोर्ट, कंपनीचे ओळखपत्र जोडावे. त्यानंतर सर्व कागदपत्रे तपासून त्या विभागाच्या पोलीस यंत्रणेकडून ई-पास दिला जाईल.

तीच ती कारणे

ई-पाससाठी रुग्णालयात जायचे आहे, हे कारण ठरलेले आहे. तर काही नागरिकांकडून अंत्यसंस्काराला जायचे आहे, असे कारण सुद्धा दाखवण्यात येते.

ही कागदपत्रे हवीत

ई-पाससाठी कराव्या लागणाऱ्या अर्जासोबत तुम्हाला तुमचा फोटोही जोडावा लागणार आहे. फोटोची साईज २०० केबीपेक्षा जास्त नसावी. फोटो ओळखपत्र म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना आदी कागदपत्रे देता येऊ शकतात.

Web Title: There are two reasons for e-pass; Hospital or funeral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.