चार महिन्यांपासून कृषी पंपाचे कनेक्शन नाही

By admin | Published: May 15, 2015 11:40 PM2015-05-15T23:40:16+5:302015-05-15T23:40:16+5:30

मेहकर तालुक्यातील प्रकार; शेतक-याचा आत्मदहन करण्याचा इशारा.

There is no connection of agricultural pumps for four months | चार महिन्यांपासून कृषी पंपाचे कनेक्शन नाही

चार महिन्यांपासून कृषी पंपाचे कनेक्शन नाही

Next

मेहकर (जि. बुलडाणा) : तालुक्यातील भोसा येथील एका शेतकर्‍याने चार महिन्यांपूर्वी वीज कंपनीकडे कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी अर्ज केला. अद्याप वीज जोडणी न मिळल्यामुळे उत्पादनावर परिणाम होत असल्याने त्रस्त झालेल्या शेतकर्‍याने आत्मदहन करण्याचा इशारा १४ मे रोजी दिला आहे. तालुक्यातील भोसा येथील दीपक तुकाराम चव्हाण या शेतकर्‍याला मेहकर पंचायत समितीमार्फत शासनाच्या जलपूर्ती सिंचन योजनेंतर्गत विहीर मंजूर झाली आहे. दीपक चव्हाण यांच्या सदर विहिरीचे काम पूर्ण झालेले आहे. सदर विहिरीवर कृषी पंपाचे कनेक्शन घेण्यासाठी दीपक चव्हाण यांनी मेहकर वीज वितरण कंपनीकडे २ फेब्रुवारी २0१५ रोजी अर्ज केलेला आहे; परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी चार महिन्यांचा कालावधी होऊनसुद्धा या विहिरीवरील कृषी पंपाच्या कनेक्शनसाठी सर्व्हे केलेला नाही. पोल उभे केलेले नाही. दीपक चव्हाण यांच्या विहिरीला पाणी असतानाही केवळ वीज कनेक्शन नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊन सदर शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. काही शेतकर्‍यांनी दीपक चव्हाण यांच्यानंतर वीज कंपनीकडे वीज कने क्शनसाठी अर्ज करून संबंधित अधिकार्‍यांसोबत पैशाची देवाण-घेवाण करून वीज कनेक्शन जोडून घेतले आहे; मात्र दीपक चव्हाण यांचा अर्ज अगोदर असूनही त्यांना अद्याप कनेक्शन देण्यात आले नसल्याने त्रस्त झालेल्या दीपक चव्हाण यांनी २१ मेपर्यंत कृषी पंपाचे कनेक्शन न दिल्यास २१ मे रोजी मुख्य कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय, अकोला येथे आत्मदहन करण्याचा इशारा १४ मे रोजी निवेदनाद्वारे दिला आहे.

Web Title: There is no connection of agricultural pumps for four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.