चार तालुक्यांत एकही नवीन पाॅझिटिव्ह नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:39 AM2021-07-14T04:39:34+5:302021-07-14T04:39:34+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून साेमवारी चार तालुक्यांत एकही नवीन पाॅझिटिव्ह रुग्ण आढळला नाही़ तसेच इतर ...

There is no new positive in four talukas | चार तालुक्यांत एकही नवीन पाॅझिटिव्ह नाही

चार तालुक्यांत एकही नवीन पाॅझिटिव्ह नाही

Next

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून साेमवारी चार तालुक्यांत एकही नवीन पाॅझिटिव्ह रुग्ण आढळला नाही़ तसेच इतर तालुक्यात १८ नव्या रुग्णांची भर पडली असून २७ रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे़ तसेच ७५७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत़

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये नांदुरा शहर ३ , खामगांव शहर १ , सिं. राजा तालुका साखरखेर्डा २ , जळगांव जामोद तालुका बोराळा १, चिखली शहर : २, चिखली तालुका बेराळा १, दे. राजा शहर २, दे. राजा तालुका मंडपगांव १, मेहकर तालुका चिंचोली १, बुलडाणा शहर १, बुलडाणा तालुका देऊळघाट १, लोणार तालुका टिटवी येथील दाेन रुग्णांचा समावेश आहे तसेच आजपर्यंत सहा लाख दाेन हजार ६४६ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ८६ हजार ३८६ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

८३ रुग्णांवर उपचार सुरू

जिल्ह्यात आज रोजी १३६० नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजअखेर एकूण ८७ हजार १३४ कोरोनाबाधित रूग्ण आहेत़ त्यापैकी ८६ हजार ३८६ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोविडचे ८३ सक्रीय रूग्ण असून उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत ६६५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Web Title: There is no new positive in four talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.