१० तालुक्यांत एकही रुग्ण नाही, ६ पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:35 AM2021-07-28T04:35:50+5:302021-07-28T04:35:50+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी हाेत आहे. मंगळवारी १० तालुक्यांमध्ये एकही नवीन रुग्ण आढळला नाही, तसेच ...
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी हाेत आहे. मंगळवारी १० तालुक्यांमध्ये एकही नवीन रुग्ण आढळला नाही, तसेच तीन तालुक्यांमध्ये सहा जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. १,३९४ काेराेना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये संग्रामपूर तालुका पातुर्डा १, वकाणा १, संग्रामपूर शहर १, चिखली तालुका डोढरा १, अंत्री खेडेकर १, बुलडाणा तालुका : सुंदरखेड येथील एका रुग्णाचा समावेश आहे, तसेच आजपर्यंत ६ लाख ३१ हजार २५८ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे, आजपर्यंत ८६ हजार ५५२ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
२२ रुग्णांवर उपचार सुरू
आज रोजी १,५५६ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ८७ हजार २४६ कोरोनाबाधित रूग्ण असून, त्यापैकी ४६ हजार ५५२ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे २२ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत, तसेच आजपर्यंत ६७२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.