हंगाम तोंडावर: हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत नियोजन नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 03:40 PM2018-12-04T15:40:46+5:302018-12-04T15:41:35+5:30

खामगाव: यंदाचा तुरीचा हंगाम तोंडावर आला असताना, हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हयात अद्याप कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याचे दिसून येते.

There is no planning to start pulces purchase Centers | हंगाम तोंडावर: हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत नियोजन नाही 

हंगाम तोंडावर: हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत नियोजन नाही 

Next


देवेंद्र ठाकरे
लोकमत न्युज नेटवर्क
खामगाव: यंदाचा तुरीचा हंगाम तोंडावर आला असताना, हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हयात अद्याप कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याचे दिसून येते. शेतकºयांकडून मात्र तूर खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणीची मागणी जोर धरत आहे.
शेतकºयांना शेतमालाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी शासनाकडून प्रत्येक तालुक्यात हमीभावाने शासकीय खरेदी केंद्र सुरू करून शेतमाल हमीभावाने खरेदी करण्याचा प्रयत्न गेल्या दोन वषार्पासुन प्रयत्न सुरू आहे. असे असताना, खरेदीचे नियोजन वेळेवर होत नसल्याने हंगाम निघून गेल्यानंतर खरेदी केंद्र सुरू होते व याचा लाभ शेतकºयांऐवजी व्यापाºयांनाच जास्त होताना दिसून येत आहे. त्यामुळे शेतमालाची शासकीय खरेदी वेळेत सुरू करावी, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे. यावर्षी उडीद, मुग, सोयाबिन उत्पादक शेतकºयांना खरेदी वेळेत सुरू न झाल्याने आपला शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागला. हीच परिस्थीती तूर उत्पादक शेतकºयांची होऊ नये, यासाठी तूर खरेदी साठी आॅनलाईन नोंदणी सुरू करावी, अशी मागणी संपुर्ण जिल्ह्यात जोर धरू लागली आहे. येत्या पंधरा दिवसात तुरीचा हंगाम सुरू होणार असल्याने शेतकºयांकडून मागणी जोर धरत असताना, संबंधित विभागाकडून मात्र याबाबत कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तब्येत बरी नसल्याचे सांगून त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. 


वस्तुस्थिती पटवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठविल्या शेंगा!
तुरीचा हंगाम अगदी जवळ आला आहे, हे पटवून देण्यासाठी संग्रामपूर तालुक्यातील भारीप बहूजन महासंघाच्या पदाधिकाºयांनी शेतकºयांना सोबत घेत तुरीच्या पक्क्या झालेल्या शेंगा तहसीलदारांमार्फत मुख्यंमत्र्यांना पाठविल्या. सोबतच हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी लवकर सुरू करण्याची मागणी करणारे निवेदनही दिले. 

 
मागील वर्षीच्या अनुदानाचा प्रश्न निकाली काढा!
मागील वर्षी हमीभावाने तूर विक्रीसाठी शेतकºयांनी नोंदणी केलेल्या, परंतु मालाचे मोजमाप होऊ न शकलेल्या शेतकºयांना प्रतिक्विंटल १ हजार रूपये अनुदान जाहीर करण्यात आले होते. हे अनुदान अद्याप  अनेक शेतकºयांना मिळाले नाही. अनेकांच्या खात्यात केवळ पाचशे-सातशे रूपये जमा करण्यात आले. ही थट्टा थांबवावी, अशी मागणी स्वाभीमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केली आहे. यावर्षी तूर खरेदी वेळेत सुरू करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 
 

सरकारला निवेदनाची भाषा समजत नाही. त्यामुळे यासंदर्भात लवकरच मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करणे, ही मागणी महत्वाची आहेच; परंतु याचा सर्वाधिक लाभ व्यापाºयांनाच होतो. तेव्हा शेतकºयांनी इतरत्र विक्री केलेल्या मालावरही भावफरक अनुदान देण्यात यावे, अशी आमची मागणी राहणार आहे.
- रविकांत तुपकर
प्रदेशाध्यक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना

Web Title: There is no planning to start pulces purchase Centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.