करवसुली पावतीची रेकाॅर्डला नाेंदच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:40 AM2021-07-14T04:40:10+5:302021-07-14T04:40:10+5:30

डोणगाव : तालुक्यातील अंजनी बु़ ग्रामपंचायतच्या विविध विकास कामात गैरप्रकार झाल्याची तक्रार करण्यात आली हाेती. या तक्रारीवरून चाैकशी ...

There is no record of tax receipt | करवसुली पावतीची रेकाॅर्डला नाेंदच नाही

करवसुली पावतीची रेकाॅर्डला नाेंदच नाही

Next

डोणगाव : तालुक्यातील अंजनी बु़ ग्रामपंचायतच्या विविध विकास कामात गैरप्रकार झाल्याची तक्रार करण्यात आली हाेती. या तक्रारीवरून चाैकशी सुरू करण्यात आली आहे. या चाैकशीत करवसुली पावत्यांची रेकाॅर्डला नाेंदच नसल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतचे शिपाई व लिपिक अडचणीत आले आहेत. या दाेन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी हाेत आहे.

गत काही दिवसांपासून ग्रामपंचायत लिपिक हे ग्रामस्थांना घरपट्टी, नळपट्टी व गावनमुना आठची नक्कल देऊन, वरच्या वर डुब्लिकेट पावती देऊन पैसे हस्तागत करत होते. त्या पैशांची शासकीय रेकॉर्डला कुठेही नोंद न करता व ग्रामसेवक किंवा सरपंचाला माहिती न देता, परस्पर गावातील नागरिकांना घरपट्टी नळपट्टी देऊन कर वसुली करत होते. त्यातून जमविलेले पैसे हे स्वत:च घेत हाेते, ही बाब लक्षात आल्याने गावकऱ्यांनी रितसर तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकारी आशिष पवार यांनी कृषी विस्तार अधिकारी मुळे यांना चाैकशीचे आदेश दिले हाेते. त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये रेकार्ड्स तपासणी केली असता, रेकॉर्डमध्ये नागरिकांच्या घरपट्टी, नळपट्टी करवसुलीची कोठेही नोंद आढळून आल्या नाहीत.

१२ पावत्यांची नाेंदच नाही

चाैकशीदरम्यान गाव नमुना आठच्या काही खोट्या नोंदी निर्दशनास आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. कृषिविस्तार अधिकारी यांनी गावातील १६ नागरिकांच्या तक्रारीनुसार ग्रामपंचायत रेकॉर्डची तपासणी केली हाेती. यामध्ये १६ घरकर वसुली पावतीपैकी १२ घरकरवसुली पावतीची १८ हजार ८९३ रुपयांची रेकॉर्डला वसुली केल्याची नोंदच नसल्याचे उघड झाले आहे, तसेच बनावट सह्या असल्याची आढळून आल्या आहेत, तर गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतच्या दोन कर्मचारी शिपाई व लिपिककडे बोट दाखवल्याने, हे कर्मचारी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

नळपट्टीच्या वसुलीची चाैकशी करा

अंजनी बुद्रुकमध्ये जवळपास १,५०० घर क्रमांक असल्याने, आता सर्वच गावकऱ्यांच्या घरपट्टी नळपट्टीच्या वसुली पावतीची रेकॉर्डला नोंद आहे का नाही, यांची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या अडचणीत निश्चितच वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चाैकशी पथकात यांचा हाेता समावेश

ग्रामपंचायतमध्ये या रेकॉर्डची तपासणी करतेवेळी एटीमुळे कृषिविस्तार अधिकारी, ग्रामसेवक रामकृष्ण शेळके, सरपंच, ग्रा.पं. सदस्य रामभाऊ राऊत, अमोल शेवाळे, राजू मोरे, तर गावातील नागरिक उषाबाई नागोलकर, गजानन नागोलकर, समाधान पदमने, विष्णू ढोले, अशोक नागोलकर, कविता नागोलकर, देविदास वाठ, नारायण कराळे, रवि पायघन, डिगांंबर त्र्यंबके आदी उपस्थित होते.

गटविकास अधिकारी यांच्या आदेशानुसार, अंजनी बुद्रुक येथे ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार करवसुली पावत्यांच्या १६ पैकी १२ पावत्यांची ग्रामपंचायत रेकॉर्डला कुठेही नोंद आढळून आली नाही, तसेच करवसुली पावतीवर बनावट सह्या असल्याचे निर्दशनास आढळून येते. त्यामुळे ग्रामपंचायत शिपाई व लिपिक संशयित असून, येथील चौकशीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करत आहाेत.

एटीमुळे, कृषी विस्तार अधिकारी पं.स. मेहकर

Web Title: There is no record of tax receipt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.