कृउबासच्या कोणत्याही संचालकाचे पद धोक्यात नाही !
By Admin | Published: October 17, 2016 02:31 AM2016-10-17T02:31:07+5:302016-10-17T02:31:07+5:30
खामगाव बाजार समिती सभापती संतोष टाले यांचा दावा.
खामगाव, दि. १६- बाजार समिती सभापती, उपसभापती आणि संचालकांचे पद धोक्यात असल्याबाबत चर्चा होत आहे. मात्र सेवा सहकारी सोसायटी बरखास्तीला न्यायालयात आव्हान देण्यात आले असल्याने कोणत्याही संचालकाचे पद धोक्यात नसल्याचा दावा कृउबास सभापती संतोष टाले यांनी प्रसिध्दी पत्रकातून केला आहे.
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने कृउबास निवडणुकीत सर्व शक्तीनिशी शथीर्चे प्रयत्न केले. परंतू त्यांना यश आले नाही. त्यामुळे सत्तेचा दुरूपयोग करून सोसायट्या बरखास्त करणे, त्या माध्यमातून गैर कायदेशीर गुंता करून संचालकांना त्रास देणे, असे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढीस लागले आहेत. जिल्हा उपनिबंधक आणि तत्सम अधिकार्यांनी काही कृउबासमध्ये या धर्तीवर राजकीय दबावाखाली काही संचालकांना कायम, तर काही संचालकांना अपात्र ठरविले. निबंधकांनी विरोधाभासी निर्णय दिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तथापि, आजपयर्ंत खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालकांना अपात्र ठरविण्यासाठी तक्रार अर्ज दाखल नाही. सेवा सहकारी सोसायटीची मुदत संपल्याने तालुक्यातील काही सोसायट्यांवर नियमबाह्य पध्दतीने प्रशासक नेमले आहेत. या प्रशासक नेमणुकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात १३ ऑक्टोबर २0१६ रोजी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेचा क्रमांक डब्ल्यू पी.नं. ५९४९/१६, ५९५0/१६, ५९५१/१६ असा असून, सदर याचिकेवर न्यायालयाने अंतरिम स्थगनादेश दिला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, राजकीय दबावातून सुरू असलेल्या छळाबाबत आपणाला नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वासही पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.