मेहकर व लोणार तालुक्यात होणार ४१ द्वारयुक्त सिमेंट बंधारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:31 AM2021-04-03T04:31:16+5:302021-04-03T04:31:16+5:30
मेहकर व लोणार तालुक्यात ४१ द्वारयुक्त सिमेंट बंधाऱ्यांकरिता ४० कोटी २६ लक्ष ६१ हजार रुपये खर्च होणार आहेत. हे ...
मेहकर व लोणार तालुक्यात ४१ द्वारयुक्त सिमेंट बंधाऱ्यांकरिता ४० कोटी २६ लक्ष ६१ हजार रुपये खर्च होणार आहेत. हे बंधारे मंजूर करून घेण्यासाठी खा. प्रतापराव जाधव व आ. संजय रायमुलकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाग यांच्या भेटी घेतल्या होत्या. मेहकर व लोणार तालुक्यातील देऊळगाव माळी येथे ३, दुधा, वरवंड, रायपूर, नांद्रा, राजणी २, सुलतानपूर २, भानापूर, राजगड २, हिवरा खुर्द, घाटनांद्रा दोन, जयताळा, शेलगाव, आंध्रुड, अंजनी २, बोरी, सारंगपूर, दे.वायसा ३, गोत्रा, अंत्री, गांधारी, चिंचाळा, देऊळगाव साकरशा २, लोणार (भाग २ वाडी शिवार), लोणी काळे, लोणी गवळी २, कल्याणा, लांडेवाडी, माळेगाव, डोणगाव येथे बंधारे होणार आहेत. या आधी सुध्दा मेहकर व लोणार तालुक्यात ३० कोटी रुपयांचे २८ बंधारे झाले आहेत. यामुळे सिंचनाला मोठा फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.