राज्यातील सर्वच कारागृहांत होणार कीर्तनाचा गजर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 07:03 AM2023-07-16T07:03:54+5:302023-07-16T07:04:22+5:30

राज्यात नऊ मध्यवर्ती कारागृहे, ३१ जिल्हा कारागृहे, १९ खुली कारागृहे आणि एक महिला कारागृह अशी एकूण ६० कारागृहे आहेत

There will be kirtana in all the prisons of the state! | राज्यातील सर्वच कारागृहांत होणार कीर्तनाचा गजर!

राज्यातील सर्वच कारागृहांत होणार कीर्तनाचा गजर!

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
मेहकर (जि. बुलढाणा) : गुन्हेगारांच्या विचारांत बदल घडण्यासाठी त्यांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. त्यासाठी वारकरी आचारसंहिता परिषदेचे प्रवर्तक नीलेश महाराज झरेगावकर हे राज्यातल्या सर्व कारागृहांत कीर्तनाचा गजर घडविणार आहेत. १५ जुलैला मेहकर येथील नरसिंह संस्थानमध्ये येऊन श्वासानंद गुरुपीठाचा आशीर्वाद घेऊन त्यांनी या उपक्रमाच्या शुभारंभासाठी प्रस्थान केले आहे. 

राज्यात नऊ मध्यवर्ती कारागृहे, ३१ जिल्हा कारागृहे, १९ खुली कारागृहे आणि एक महिला कारागृह अशी एकूण ६० कारागृहे आहेत. या सर्व कारागृहांची क्षमता २५ हजार कैद्यांची असताना त्यात ४१ हजार  कैदी ठेवण्यात आले आहेत. केवळ दंड देण्यामुळे ही संख्या घटणार नाही, तर विचारांत बदल झाल्यामुळेच ही संख्या घटेल. 

Web Title: There will be kirtana in all the prisons of the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.