देवपूर परिसरातील पाण्याचा प्रश्न लागणार मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:34 AM2021-02-10T04:34:53+5:302021-02-10T04:34:53+5:30

तेथील पिण्याचा पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न कायम होता; परंतु आता देवपूर पाझर तलाव क्रमांक दोनच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यामुळे ...

There will be a problem of water in Devpur area | देवपूर परिसरातील पाण्याचा प्रश्न लागणार मार्गी

देवपूर परिसरातील पाण्याचा प्रश्न लागणार मार्गी

Next

तेथील पिण्याचा पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न कायम होता; परंतु आता देवपूर पाझर तलाव क्रमांक दोनच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यामुळे तेथील पाण्याचा प्रश्न आता कायमचा निकाली निघणार आहे.

देवपूर हे गाव मागील अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करीत आहे. देवपूर येथील पिण्याच्या पाण्याची, तसेच सिंचनाची समस्या सोडविण्यासाठी मागील काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न झाले; परंतु त्याला यश आले नाही. देवपूर येथे विदर्भ सघन सिंचन विकास योजनेमधून पाझर तलाव क्रमांक एक व दोनला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तसेच पाझर तलाव क्रमांक तीनचा सर्व्हे करण्यात आलेला होता; परंतु विदर्भ सघन सिंचन योजना बंद करण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतरही प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी मोठा कालावधी लागला. दरम्यानच्या काळामध्ये या पाझर तलावांचे काम हे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद यांच्याकडे वर्ग करण्यात आले. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतरही पाच ते सहा वर्षांपासून पाझर तलावांचे काम रखडलेले होते. देवपूर येथील पाझर तलावांचे काम तातडीने सुरू करण्यात यावे आणि तेथील पिण्याच्या पाण्याची तसेच सिंचनाची समस्या कायमची निकाली निघावी, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ॲड. जयश्री शेळके यांनी या कामाच्या संदर्भात संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. दरम्यानच्या काळामध्ये पालकमंत्री ना. राजेंद्र शिंगणे यांच्याकडेही पाझर तलाव क्रमांक एक व दोनचे काम तातडीने सुरू करण्यात यावे यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. आता मोठ्या प्रतीक्षेनंतर देवपूर पाझर तलाव क्रमांक दोनच्या ६७.७० लक्ष रुपयांच्या कामाला सुरुवात झालेली आहे.

कामाची पाहणी

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस तथा जि.प. सदस्य ॲड. जयश्री शेळके यांनी देवपूर येथील

पाझर तलावाच्या सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाझर तलावाच्या कामाची पाहणी करतेवळी

संबंधित विभागाचे अधिकारी भगवान वारे, उमाकांत वारे, किरण दोतोंडे, दशरथ नरोटे, आस्तिक वारे, गणेश कुन्नर, हरेश कांबळे, रघुनाथ नरोटे, शामराव नप्ते, अमोल वारे, सचिन वारे, आनंथा नप्ते, सुनील नरोटे, पवन वारे, निवास वारे, गंगाधर नरोटे, दिलीप नरोटे, चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: There will be a problem of water in Devpur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.